Friday, May 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedनाल्यांची सफाई करून डासांवर प्रतिबंधात्मक फवारणी करा.संत श्री साईबाबा बहुउद्देशीय संस्थेची मागणी

नाल्यांची सफाई करून डासांवर प्रतिबंधात्मक फवारणी करा.संत श्री साईबाबा बहुउद्देशीय संस्थेची मागणी

 

घुग्घूस).      AMC24 News.

शहरातील नाल्या गाळ व कचऱ्यामुळे तुंबलेल्या आहेत व त्यामुळे डासांचा हैदोस शहरात वाढण्याची श्यक्यता आहे.तसेच पावसाचे पाणी तुंबण्याचा धोका निर्माण होणार असून, डासांच्या वाढत्या प्रभावामुळे डेंग्यू-मलेरियासारख्या रोगांचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. करिता मुख्याधिकारी या नात्याने शहरातील संपूर्ण प्रभागांचा सर्व्हे करून शहरातील संपूर्ण नाल्या स्वच्छ करण्याचे निर्देश सफाई कर्मचाऱ्यांना द्यावे, अशी मागणी शहर संत श्री साईबाबा बहुउद्देशीय संस्थेनी निवेदनाद्वारे केली आहे.

शहरातील सर्व प्रभागातील तुंबलेल्या नाल्या स्वच्छ करण्यास नगर पंचायतच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सांगितल्या नंतरही शहरातील काही प्रभागातील नाली स्वच्छतेची पावसाळ्यापूर्व कामे झालेली नाहीत.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी शहरातील नाल्यांची सफाई करून डासांवर प्रतिबंधात्मक फवारणी करण्यात येते; परंतु यावर्षी कोणतीही कामे नगर पंचायततर्फे शहरात करण्यात आलेली नाहीत.पावसाळ्याला सुरुवात झाली असून नालीतील गाळ काढला गेला नसल्याने याचा त्रास शहरवासीयांना सहन करावा लागत आहे.याकरिता या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी संत श्री साईबाबा बहुउद्देशीय संस्थेनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे. निवेदन देताना संस्थेचे अध्यक्ष गणेश शेंडे, उपाध्यक्ष गणेश वझे, कोषाध्यक्ष शंकर कामतवार, सचिन बोन्डे व संस्थेचे सदस्य उपस्थित होते

AMC24 News. मुख्य संपादक 

अरविंद चाहादे घुग्घूस 

9405714165

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular