Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedपॉवर प्लांटमध्ये उंचावरून पडल्याने वेल्डरचा मृत्यू; सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर घुग्घुसच्या...

पॉवर प्लांटमध्ये उंचावरून पडल्याने वेल्डरचा मृत्यू; सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर घुग्घुसच्या नवीन पॉवर प्लांट विस्तार प्रकल्पातील दुर्दैवी घटना

पॉवर प्लांटमध्ये उंचावरून पडल्याने वेल्डरचा मृत्यू; सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

घुग्घुसच्या नवीन पॉवर प्लांट विस्तार प्रकल्पातील दुर्दैवी घटना.    

घुग्घुस (चंद्रपूर) : येथील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या नवीन पॉवर प्लांट विस्तार प्रकल्पात काम करत असताना उंचावरून पडल्याने एका वेल्डरचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कंपनीतील कामगारांच्या सुरक्षेचा आणि कंत्राटदारांच्या हलगर्जीपणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.   

मिळालेल्या माहितीनुसार, हरेंद्र राम (वय 37) हे एमसीके कुट्टी इंजिनिअरिंग या आउटसोर्सिंग कंत्राटदार कंपनीमार्फत कामावर होते. नवीन पॉवर प्लांटमध्ये उंचावर वेल्डिंगचे काम सुरू असताना तोल गेल्याने ते खाली कोसळले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर 25 ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. उंचावर काम करताना आवश्यक असणारा सेफ्टी बेल्ट, सुरक्षाजाळी तसेच इतर प्रतिबंधात्मक सुरक्षा उपाय उपलब्ध करून देण्यात आले होते का, याची चौकशी करण्याची मागणी कामगारांकडून होत आहे.     

अपघातानंतर लॉयड्स मेटल्सच्या चेअरपर्सन यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी भेट घेतली असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणाबाबत कंपनीकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेची निष्पक्ष चौकशी करून सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच मृत कामगाराच्या कुटुंबीयांना तातडीने योग्य आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कामगार आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.   

कामगारांच्या सुरक्षेशी तडजोड होणार नाही, यासाठी संबंधित प्रशासन व कंपनीने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.    

AMC24 News 📰.

मुख्य संपादक अरविंद चाहादे घुग्घुस

9405714165.

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular