थकलेल्या देहांना सात महिन्यापासून अडलेला निराधार योजनेचा अनुदान तातळीने द्या : राजुरेड्डी

डिजिटल हयात प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला जोडण्या करीता मुद्दत वाढवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
AMC24 News
घुग्घूस : देशातील वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त, विधवा व परित्यकता महिलांना जिवन जगण्यास अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने केंद्र शासनाने 1980 साली संजय गांधी निराधार योजना सुरू केली
ही योजना गेल्या अनेक वर्षांपासून अगदी सुरळीतपणे सुरू होती.मात्र राज्यात नव्याने सुरू करण्यात आलेल्या लाडक्या बहीण योजने नंतर
निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या सात महिन्यापासून अनुदान मिळालेला नाही.
लाभार्थ्यांना दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यावर एप्रिल ते जून महिन्यात उत्पन्नाचा दाखला जमा करण्याचा तसेच डिजिटल हयात फॉर्म जोडण्याची सक्ती शासनाने केल्याने अनेक लाभार्थ्यांना याची माहितीच नसल्याने ते ही प्रक्रिया करण्यास असमर्थ ठरले आहे.
आणि आता जून महिना संपत येत असल्यामुळे मुद्दत ही संपत येत असल्याने निराधार योजनेचे लाभार्थी प्रचंड मानसिक व शारीरिक तनावात आले आहे.निराधार योजनेची डिजिटल हयात व उत्पन्नाचा दाखला जमा करण्याची मुद्दतवाढ देण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे.
निराधार योजनेचे गेल्या सहा ते सात महिन्यापासून पैसे न मिळाल्याने वयोवृद्ध नागरिकांना दोन वेळच्या जेवणास ही मोताज होण्याची वेळ आलेली आहे.
हे थकलेले देह बँक ते तहसील कार्यालय पर्यंतच्या चकरा टाकून – टाकून त्रस्त झालेले आहेत.
व्यवस्थित चालता व बोलता ही येत नसल्याने या वयोवृद्ध नागरिकांना अनेकदा बँकेतील कर्मचाऱ्यांच्या अभद्र व्यवहाराचा सामना करावा लागत आहे.
मानवीय दृष्टीकोनातून ही समस्या तात्काळ निकाली काढावी अशी मागणी घुग्घूस काँग्रेसने केली आहे.याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, जिल्हा महासचिव अलीम शेख,सुनील पाटील,दिपक पेंदोर,तालुका सचिव विशाल मादर, एन. एस. यु. आय अध्यक्ष आकाश चिलका,इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख,बालकिशन कुळसंगे, कुमार रुद्रारप, अरविंद चहांदे, दिपक कांबळे,रोहित डाकूर, नुरूल सिद्दीकी, सुमेश रंगारी,रंजित राखुंडे, अंकुश सपाटे, व मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
AMC24 News घुगुस
मुख्य संपादक अरविंद चाहादे 9405714165



