Friday, May 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedगुंतवणूकदारांनी घेतली आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची भेट.! सुधीर भाऊ यांनी दिले न्याय...

गुंतवणूकदारांनी घेतली आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची भेट.! सुधीर भाऊ यांनी दिले न्याय मिळवून देण्याचे आश्वासन!

चंद्रपूर(का.प्र.):      AMC24 News

 

चंद्रपूर जिल्यातील अनेक सामान्य नागरिक ७% मासिक नफ्याच्या आमिषाने मोठ्या आर्थिक फसवणुकीला बळी पडले असून, हे प्रकरण सध्या जिल्ह्यात गंभीर चिंता आणि अस्वस्थतेचा विषय ठरत आहे. या प्रकरणी गुंतवणूकदारांनी थेट आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची भेट घेऊन आपबिती मांडली आणि न्यायासाठी मदतीची विनंती केली.

या पार्श्वभूमीवर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने हे प्रकरण लवकरात लवकर निपटारा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे महामंत्री व माजी जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महामंत्री रामपाल सिंग, मनोज सिंघवी, नम्रता ठेमस्कर, किरण बुटले, उमेश अष्टणकर व भाऊंचे स्वीय सहाय्यक संजय राईंचवार यांच्या शिष्टमंडला पाठवून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची भेट घेऊन सदर प्रकरण तातडीने सोडविण्यासाठी संपूर्ण सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले.

यानंतर पोलीस अधीक्षकांनी गुंतवणूकदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि संबंधित प्रकरणात तत्काळ तपास सुरू करण्याचे आदेश दिले.

गुंतवणुकीच्या नावाखाली संजय हांडेकर (रा. सिंदेवाही) आणि कैलास लांडगे (रा. बाबुपेठ, चंद्रपूर) या दोघांनी प्लॉट विक्री, व्यापार, निधी योजना आदींच्या माध्यमातून अनेक नागरिकांचा विश्वास संपादन केला. प्रारंभी काही महिन्यांपर्यंत व्याज दिल्यानंतर फेब्रुवारी २०२३ पासून त्यांनी व्यवहार बंद करत नागरिकांचे पैसे थांबवले. परिणामी, अनेकांचे आयुष्य आर्थिक संकटात सापडले असून, काहीजण कर्जाच्या ओझ्यामुळे मानसिक तणावात आहेत.

मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, तक्रारदारांनी जे कागदपत्रे सादर केली आहेत, त्यांची पडताळणी करून लवकरात लवकर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच, पीडित गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे.

या त्वरित आणि संवेदनशील हस्तक्षेपाबद्दल नागरिकांनी आमदार सुधीर मुनगंटीवार आणि पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व डॉक्टर मंगेश गुलवाडे यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, या प्रकरणात न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.    

AMC24 News. मुख्य संपादक 

अरविंद चाहादे घुग्घूस

9405714165

 

Previous article
Next article
*अदानी फाऊंडेशन तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी आसनव्यवस्थेस सहाय्य* अदानी फाऊंडेशन, अदानी चांदा सिमेंट वर्क्सच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर व वणी तालुक्यातील ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. या अंतर्गत जिल्हा परिषद शाळा बोरगाव, ढाकोरी, चनाखा, नकोडा व प्रियदर्शनी विद्यालय घुगुस या पाच शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार आसनव्यवस्था बेंच उपलब्ध करून देण्यात आले. विद्यार्थ्यांना बसण्याच्या सोयीसाठी उत्तम सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. पूर्वी अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून शिक्षण घ्यावे लागत होते. त्यामुळे डेस्क-बेंच उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचे अध्ययनास सुलभ झाले असून, विद्यार्थी, शिक्षक व पालक वर्गाकडून अदानी फाऊंडेशनच्या सामाजिक बांधिलकीबद्दल समाधान व्यक्त होत आहे. शाळेतील शिक्षकांनी सांगितले की, “अदानी फाउंडेशनने ग्रामीण भागातील शाळांना केलेले सहाय्य विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मोलाची भेट असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशासाठी दिलेली संधी आहे.”
RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular