Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedवनहक्कासाठी सुरू असलेल्या शांततामय साखळी आंदोलनाला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा..! ...

वनहक्कासाठी सुरू असलेल्या शांततामय साखळी आंदोलनाला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा..! प्रलंबित वनहक्क दावे तातडीने मंजूर करण्याची संतोष पारखी यांची मागणी

वनहक्कासाठी सुरू असलेल्या शांततामय साखळी आंदोलनाला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा..!

प्रलंबित वनहक्क दावे तातडीने मंजूर करण्याची संतोष पारखी यांची मागणी

चंद्रपूर, दि. ०५ सप्टेंबर २०२६ : AMC24 News 📰 

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वनहक्क दावे मंजूर करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शेतकरी व वनहक्क धारक बांधवांकडून सुरू असलेल्या शांततामय साखळी आंदोलनाला शिवसेना चंद्रपूर तालुका तसेच शिवसेना भारतीय कामगार संघटना, चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.

अनेक वर्षांपासून वनजमिनीवर शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकरी व वनहक्क धारकांचे दावे विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत. पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणे अन्यायकारक असून, प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

वनहक्क कायद्यानुसार पात्र असलेल्या सर्व दाव्यांची निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने फेरतपासणी करून तातडीने वनहक्क पट्टे मंजूर करावेत. तसेच नामंजूर झालेल्या दाव्यांची योग्य तपासणी करून पात्र शेतकरी व वनहक्क धारकांना न्याय द्यावा, अशी मागणी शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख तथा शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष लिलाबाई दशरथ पारखी यांनी केली.

ग्रामसभा, वनहक्क समित्या व संबंधित प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची योग्य तपासणी करून प्रलंबित प्रकरणांचा कालबद्ध पद्धतीने निपटारा करावा. शेतकरी व वनहक्क धारकांच्या प्रश्नांवर प्रशासनाने संबंधित प्रतिनिधींसोबत तातडीने बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

शेतकरी व वनहक्क धारकांना न्याय मिळणे हा त्यांच्या हक्काचा प्रश्न आहे. त्यांच्या शांततामय आंदोलनाला शिवसेनेचा ठाम पाठिंबा असून, प्रशासनाने तातडीने योग्य कार्यवाही करावी. अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारेल,” असा इशारा संतोष पारखी यांनी दिल

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular