*प्रतिकुल परिस्थितीतही यश मिळविणे शक्य…प्रयत्नात सातत्य गरजेचे – विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार*
*ब्रम्हपुरी येथे तालुका तथा शहर काँग्रेस तर्फे गुणवंतांचा सत्कार व मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन*
AMC24 News. मुख्य संपादक
अरविंद चाहादे 940571416
ब्रम्हपुरी.
यश मागून मिळवलं जात नाही ते मेहनतीच्या बळावर मिळवावं लागत. आपले जन्मदाते आई वडिल हेच खरे देव रुपी मार्गदर्शक असून तेच आपले गुरु पण आहेत. जीवनात यशाचे शिखर गाठायचे असेल तर आपले ध्येय विचलित होऊ देऊ नका. परिस्थिती कितीही विपरीत असली तरी त्यावर मात करून यश संपादन करणे शक्य आहे. फक्त स्वतःला पूर्णता झोकुन सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन विधिमंडळ पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रह्मपुरी येथे तालुका तसेच शहर काँग्रेस च्या वतीने आयोजित गुणवंतांचा सत्कार व मार्गदर्शन सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
आयोजित सोहळ्यास अध्यक्ष म्हणून नेवजाबाई हितकारनी महाविद्यालय माजी प्राचार्य डॉ.एन.एस.कोकोडे, काँग्रेस जेष्ठ नेते प्राचार्य डॉ देविदास जगनाडे,सत्कार मूर्ती म्हणून यूपीएससी (आय आर एस) परीक्षा उत्तीर्ण भाग्यश्री नैकले, तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जि.प.सभापती डॉ. राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, ब्रम्हपुरीचे माजी सरपंच नारायणराव बोकडे, काँग्रेस शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी प. स. सदस्य थानेश्वर कायरकर, आरपीआय नेते नेताजी मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते तथा ओबीसी नेते उमेश कोराम, व्यापारी संघ अध्यक्ष इकबाल जेसानी, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मोंटू पिलारे, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष सोनू नाकतोडे, राजेश नैकले प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
यापुढे बोलताना विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, आपल्या विधानसभा क्षेत्रातून अधिकाधिक अधिकारी घडावे याकरिता विदर्भातील सर्वात मोठी ई – लायब्ररी ब्रह्मपुरी शहरात उभारली. यात 200 विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक्रम पूर्ण करू शकणार. सोबतच शिक्षणात पुढे जाऊ शकणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना आम्ही मदतही करणार. आपण मोठे अधिकारी झाले तरी आपल्या मातीचा अभिमान बाळगा व इतरांना माणूस म्हणून मदत करा असे बहुमूल्य मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.
तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती यूपीएससी आयआरएस परीक्षा उत्तीर्ण भाग्यश्री नैकले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन पण सांगितले की, परिस्थितीचे कारण पुढे करून अपयशाला पदराशी बांधू नका. अपयशाने खचून न जाता सदैव प्रयत्नशील राहावे. माझ्या आयुष्यात विपरीत परिस्थितीवर मी मात करून केवळ वर्तमानपत्रे व मोजके पुस्तकातून आज यशाचे शिखर गाठले. आई-वडिलांची संस्कार व गुरुवर्य चे मार्गदर्शन या यशात यांचा मोलाचा वाटा असून ओबीसी खात्याचे मंत्री असताना ओबीसी विद्यार्थ्यांकरीता महाज्योती संस्था स्थापन करणारे विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वेळोवेळी सहकार्यामुळेच मला आज यश मिळवता आले असे त्यांनी आवर्जून सांगितले.
यानंतर विद्यार्थी दशेतून उज्वल भविष्य घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून उच्चशिक्षित होऊन आपले कर्तव्य व देशसेवा पार पाडावी असे बहुमोल विचार अध्यक्षीय भाषणातून नेवजाबाई हितकारणी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. कोकोडे यांनी व्यक्त केले. तत्पूर्वी प्राचार्य डॉ. देविदास जगनाडे, माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर, सामाजिक कार्यकर्ते तथा ओबीसी नेते उमेश कोराम यांनी उपस्थित यांना मार्गदर्शन केले.
यानंतर ब्रह्मपुरी तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावी तसेच महाविद्यालयीन , स्पर्धा परीक्षा, सैनिकी परीक्षा मध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर पोपटे, प्रास्ताविक डॉ. राजेश कांबळे तर आभार तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष खेमराज तिडके यांनी मानले. याप्रसंगी प्रामुख्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व गुणवंत विद्यार्थी तथा त्यांचे पालक शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.



