डरो मत!तुमच्या घराला धक्का लागू देणार नाही
अतिक्रमाणात नोटीस मिळालेल्या नागरिकांना काँग्रेसने दिला धीर
AMC24 News मुख्य संपादक
अरविंद चाहादे
9405714165
घुग्घूस : चंद्रपूर नायब तहसीलदार यांच्या कार्यलयातून शहरातील अमराई जुनी वस्ती, उडीया वस्ती, कृष्णमूर्ती किराणा ते भिमराव कोकरे यांच्या घरापर्यत असलेल्या लोकवस्तीतील नागरिकांना अतिक्रमण हटाव कारवाई अंतर्गत नोटीस देण्यात आल्याने नागरिकांन मध्ये दहशत पसरल्याने घुग्घूस शहर काँग्रेसच्या वतीने आज दिनांक 26 मे रोजी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली डरो मत! जनजागृती पदयात्रा काढण्यात आली.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी परिसरातील नागरिकांची भेटी घेऊन त्यांना समाजावून सांगितले की काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी आहे
आपल्या घराच्या कौलाला ही धक्का लागू देणार नाही.
गल्ली ते दिल्ली व जिल्हा न्यायालय ते सर्वोच्च न्यायालया पर्यंत आम्ही स्वतः लढा देऊ मात्र नागरिकांच्या मूलभूत हक्कावर घरावर गदा येऊ देणार नाही अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार,कुमार रुद्रारप,दिपक पेंदोर, सुनील पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, महिला शहर कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के,मंगला बुरांडे,शिल्पा गोहील, नीलिमा वाघमारे, हरीश कांबळे,अंकुश सपाटे, गुरुदेव गेडाम
व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.




