मेसर्स मिलीयन स्टील & पॉवर कंपनीच्या पर्यावरण जनसुनावणीत नागरिकांचा आक्रोश

AMC24 News मुख्य संपादक
अरविंद चाहादे घुगुस.
9405714165
धुग्घूस दिनांक 30 : शहररा पासून चार किलोमीटर अंतरावरील मुरसा ता. भद्रावती तसेच बेलसनी ता. चंद्रपूर याठिकाणी मेसर्स मिलीयन स्टील प्रा. लिमिटेड कंपनीच्या वतीने स्पंज आयरनच्या 2,31000 TPA उत्पादना करीता 2× 350 DRI किलन व 2,64,000 बिलेट्सच्या उत्पादना करीता तसेच बार्स आणि वायर्स, एन्गल, बिम, चॅनेल इत्यादीच्या उत्पादना करीता स्टील प्लांट व 30 MW पॉवर प्लांट प्रकल्पाचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून त्या अनुषंगाने आज दिनांक 30 मे रोजी कंपनीच्या प्रस्तावित जागेवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने पर्यावरण विषयक जाहीर लोक सुनावणीचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र प्रादेशिक नियंत्रण मंडळ उप – प्रादेशिक अधिकारी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या जनसुनावणीत मुरसा, बेलसनी, घुग्घूस, शेणगाव, येरूर, साखरवाही, म्हातारदेवी, ताडाली सह अन्य गावातील नागरिक शेतकरी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.कंपनीने जनसुनावणीची माहिती ही संपर्कात येणाऱ्या गावात दवंडी फिरवून द्यायला पाहिजे होती.मात्र कंपनीने लपवा लपवीचे धोरण अंगीकरल्याने नागरिकांना जनसुनावणीची माहितीच मिळाली नाही असा आरोप करीत नागरिकांनी जनसुनावणीत आपला आक्रोश व्यक्त केला.
स्थानिकांना रोजगार उद्योग क्षेत्रातील संपर्कात येणाऱ्या गावाना दत्तक घेणेकंपनीच्या वतीने रुग्णालय, शेतकऱ्यांना योग्य मोबदला व नुकसान भरपाई देणे, शेत पानंद रस्ते बनविणे,गावामध्ये जलशुद्धीकरण यंत्र बसविणे व गावकऱ्यांना शुद्ध पाणी पुरविणे, तसेच ग्रामपंचायतला दरवर्षी सीएसआर. फंड देण्यात यावा ही प्रमुख मागणी नागरिकांच्या वतीने ठेवण्यात आली.जनसुनावणीस उपस्थित नागरिकांन पैकी 80% नागरिकांचा उद्योगाला विरोधच दिसून आला
या जनसुनावणीत काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी,बेलसणीचे माजी सरपंच परशुराम लोडे, देविदास सावे,प्रकाश विधाते,ब्रिजभूषण पाझारे, काँग्रेस नेते सैय्यद अनवर,भाजपा नेते नामदेव डाहुले, भाजपा नेते संजय तिवारी,घुग्घूसचे माजी उपसरपंच सुधाकर बांदूरकर,सामाजिक कार्यकर्ते दीक्षित, म्हातारदेवी ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ काँग्रेस नेते संजय टिपले,भाजपा युवा नेते आशिष मासिरकर,सामाजिक कार्यकर्ते इबादुल सिद्दीकी, शिवसेना नेते गणेश शेंडे, काँग्रेस जिल्हा महासचिव अलीम शेख, काँग्रेस तालुका सचिव विशाल मादर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार,व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते



