मुख्याधिकारी रांजनकर यांची हकालपट्टी करा
कोरपना व घुग्घूस नगरपरिषदेची मागणी

AMC24 News 📰 🗞️
घुग्घूस : चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेले घुग्घूस नगर परिषद तसेच जिल्ह्यातील दुसऱ्या टोकाला असलेली कोरपना नगर पंचायत याठिकाणी सत्ता पक्षातील सदस्यांनी मुख्याधिकारी विरोधात एल्गार पुकारला आहेत.
आश्चर्य म्हणजेच या दोन्ही ठिकाणी एकच व्यक्ती हा मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत

ते म्हणजेच निलेश रांजनकर यांच्या विरोधात घुग्घूस नगरपरिषदेतील सत्ता पक्षाने हेतूपूर्वक शहराला विकासापासून वंचित ठेवण्याकरिता जवळपास एक कोटी रुपयांचा निधी वापरात न घेता योग्य पाठपुरावा न करता वेळ काढूपणाने गमावले तसेच नगराध्यक्ष उपाध्यक्ष सभापती व निवडून आलेल्या कमिटीला विश्वासात न घेता गुपचूपपणे अधिकारा बाहेरील कामे करून प्रचंड भ्रष्टाचार करीत असल्याचे

आरोप करीत नगराध्यक्ष दिप्ती सोनटक्के, बांधकाम सभापती रोशन पचारे, स्वच्छता व आरोग्य सभापती नूरूल सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे मुख्याधिकारी यांची तक्रार केली मुख्याधिकारी हटाओ घुग्घूस बचावची घोषणा दिल्या दुसरीकडे केवळ एक महिन्यापूर्वी प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कोरपना नगर पंचायतचा पदभार स्विकार करताच केवळ वेळकाढुपणा करीत असून गावातील विकास कामाकडे दुर्लक्ष करीत

असल्याचा तसेच नागरिकांचे कामे करीत नसल्याचे कुठलीच माहिती योग्यपणे देत नसल्याने त्रस्त झालेल्या कमिटीने नगराध्यक्ष नंदाताई विजय बावणे व सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मुख्याधिकारी बदलवून देण्याची मागणी केली आहे.
जनतेच्या करातील पैश्यातून एक लाख रुपया वेतन घेणारा शासकीय अधिकारी जनतेचेच विकासकामे जर करीत नसेल तर त्यावर तातळीने कारवाई होणे आवश्यक आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात नगरसेविका अर्चना प्रशांत सारोकर, नगरसेविका पल्लवी दिनेश घुले, स्वीकृत नगरसेवक तौफिक शेख रोशन दंतलवार, अजहर शेख हे उपस्थित होते.
AMC24 News 📰 🗞️
मुख्य संपादक
अरविंद चाहादे घुग्घूस
9405714165



