घुग्घूस नगरपरिषदेच्या कामचुकार मुख्याधिकारी हटाव
नगराध्यक्ष सभापती नगरसेवका तर्फे
निषेध आंदोलन

AMC24 News 📰 🗞️
घुग्घूस : शहरातील नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले तीन महिने झाले असतांना देखील शहरातील विकासकामांना गती प्राप्त झालेले नाहीत,

आज दिनांक 31 मार्च रोजी नगर परिषदेच्या प्रांगणात नगराध्यक्ष दिप्ती सोनटक्के व उप – नगराध्यक्ष राजुरेड्डी, बांधकाम सभापती रोशन पचारे, स्वच्छता सभापती नूरूल सिद्दीकी, महिला व बाल कल्याण सभापती माला ताई मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांच्या विरोधात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.
शहराच्या विकासासाठी महत्वपूर्ण असलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना 2025-26 तसेच महाराष्ट्र नगरोउत्थान महाअभियान योजनेतील जवळपास 01 कोटी रुपयांचा विकासनिधी हा शासनाला परत गेला कारण मुख्याधिकारी यांनी हेतूपूर्वक वेळकाढूपणा केला पाठपुरावा केला नाही खालील कर्मचाऱ्यांना सूचना केल्या नाही यामुळे शहरातील विकासकामांचा निधी परत गेला शहराला विकासकामा पासून वंचित रहावे लागले यामुळे सत्तापक्षाच्या पदाधिकाऱ्यांन मध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहेत.

शहराच्या विकासासाठी महत्वपूर्ण असलेल्या कामाकडे मुख्याधिकारी हेतूपूर्वक कानडोळा करीत असतो
नगराध्यक्ष तसेच सभापती यांना कुठल्याही विषयात विश्वासात घेत नाही.
कार्यलयीन वेळेत कार्यलयात येत नाही सांयकाळी 06:वाजताच्या नंतर कार्यलयात येऊन ठेकेदारांशी बैठक करतो यात कुणालाही सहभागी करीत नाही.
शहरातील मुख्यमार्गांवर भर लोकवस्तीत देशी दारू भट्टीला गुपचूपपणे परवानगी दिली.
नगरपरिषदेत सभापतीना जनतेच्या समस्या समजून घेण्यासाठी कॅबिन देखील निर्माण केल्या नाहीत.
शहरातील स्वच्छता व पानी पुरवठा करीता पुरेसे मजूर नाहीत.
सोलर सिस्टीम कुचकामी ठरल्या आहेत
वॉटर एटीएम बंद अवस्थेत असून दुरुस्ती बिल मात्र नियमितपणे ठेकेदारांना दिल्या जातात अनेक शहरातील विकासकामात अनेक प्रकारचे भ्रष्टाचार रांजनकर यांच्या कार्यकाळात झालेले असून याची उच्चस्तरीय चौकशी करून रांजनकर यांना निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.

याप्रसंगी नगरसेवक स्थायी समिती सदस्य सूरज कन्नूर, नगरसेवक दिलीप पिट्टलवार, नगरसेविका वैशाली चिकनकर, नगरसेविका आशा पानघाटे,
नगरसेविका अर्चना सारोकर, नगरसेविका पल्लवी घुले, नगरसेविका सुनीता मंदेशवर पेंदोर,बाळू चिकणकर, गणेश पाणघाटे, प्रशांत सारोकर,प्रकाश निषाद, बालकिशन कुळसंगे, दिपक पेंदोर, सुनील पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते

AMC 24 News 📰 🗞️
मुख्य संपादक
अरविंद चाहादे घुग्घूस 9405714165




