विधीमंडळ गटनेते आमदार श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांचेकडून वैद्यकिय उपचारार्थ मौजा मिनघरी येथील तरुणाला आर्थिक मदत

सिंदेवाही। विषेश प्रति निधि।
AMC24 News ️
मुख्य संपादक। अरविंद चाहादे घुग्घूस
9405714165
सिदेवाही। तालुक्यातील मौजा मिनघरी येथील श्री. विनोद सदाशिव काटलाम (वय वर्षे ४२ ) अत्यंत साधारण आणि गरीब कुटुंबातील होतकरू तरुण कष्टाने संसाराचे राहाटगाडगे हाकीत होते, परंतु काही दिवसापासून जीवघेण्या कॅन्सर रोगाने विनोदला ग्रासले आणि एक मोठे संकट त्याच्या आयुष्यात आले. घरची हलाखीची परिस्थिती आणि कॅन्सर सारख्या जीवघेण्या रोगावरील महागडा उपचार अशा दुहेरी आर्थिक विवंचनेत सदर तरुण सापडला. नागपुर येथील रुग्णालयामध्ये श्री. विनोद काटलाम यांचा उपचार सध्या सुरू आहे.
मिनघरी येथील काँगेस कार्यकर्त्यांनी श्री. रमाकांतभाऊ लोधे यांना याबाबतीत माहिती दिली, त्यानंतर श्री. रमाकांतभाऊ यांनी आदरणीय श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांचेशी सदर बाबतीत चर्चा केली आणि आदरणीय विजयभाऊंनी तत्काळ मदत करण्याच्या सूचना दिल्या. सातत्याने क्षेत्रात दांडगा जनसंपर्क असणाऱ्या आदरणीय रमाकांतभाऊ यांनी आज तत्काळ मिनघरी गावातील सदर गरजवंत रुग्णाच्या घरी जाऊन कुटुंबीयांशी चर्चा करून आर्थिक मदत केली.
प्रसंगी प्रामुख्याने श्री. रमाकांतभाऊ लोधे, सभापती कृ. ऊ. बा. स. सिंदेवाही
श्री. मंगेश मेश्राम, सदस्य ग्रा. पं. रत्नापूर
श्री. रामभाऊ बोरकर, ज्येष्ठ काँगेस कार्यकर्ते मिनघरी
श्री. अनिल गुरनुले, अध्यक्ष गुरूदेव सेवा मंडळ, मिनघरी
श्री. बालाजी रामटेके, सामाजिक कार्यकर्ते , मिनघरी
श्री. सुनील तोडासे, सामाजिक कार्यकर्ते, मिनघरी
इत्यादी उपस्थीत होते।








