Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedविविध मागण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे 27 ऑक्टोबर रोजी ब्रम्हपुरीत भव्य धरणे आंदोलन!ग्रामीण...

विविध मागण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे 27 ऑक्टोबर रोजी ब्रम्हपुरीत भव्य धरणे आंदोलन!ग्रामीण भागातील होणार हजारो शेतकरी सहभागी.

विविध मागण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे 27 ऑक्टोबर रोजी ब्रम्हपुरीत भव्य धरणे आंदोलन!ग्रामीण भागातील होणार हजारो शेतकरी सहभागी.

AMC24 News ️

मुख्य संपादक।  अरविंद चाहादे घुग्घूस

9405714165

ब्रम्हपुरी प्रतिनिधी :–   राज्यातील सरकार शेतकरी ,शेतमजूर,जबरानजोत ,झोपडपट्टीधारक,संजय गांधी ,श्रावणबाळ , अपंग निराधार यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.त्याचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत.सरकारने केलेली वचनपूर्तीची आठवण करून देण्यासाठी दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ ला भारतीय कम्युनिस्ट पार्टी व महाराष्ट्र राज्य किसान सभा यांच्या वतीने शेतकरी,शेतमजूर जबरानजोत झोपडपट्टीधारक संजय गांधी निराधाराचा विशाल आक्रोश धरणे आंदोलन कॉ.विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करा, शेतकऱ्यांना बीन व्याजी कर्ज द्या, पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क तात्काळ माफ करा, जबरंजोतधारका, झोपडपट्टीधाकांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे , अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ७० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतकरी,शेतमजूर, असंघटित कामगार यांना दरमहा ५ हजार रुपये मानधन देण्याचा कायदा करावा, संजय गांधी निराधार योजनेचे थकीत रक्कम त्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावे,जंगल व्याप्त गावात वाघांचा तात्काळ बंदोबस्त करावा,मुडझा आवळगांव रोड चे काम जलदगतीने सुरू करावे.आदी मागण्यासाठी दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ ला सकाळी ११ ते ४.०० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विशाल आक्रोश धरणे आंदोलन करण्यात येत असून सबंधित मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात येईल.सदर धरणे आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्यासाठी ग्रामीण भागातील बरडकिन्ही गावासह अनेक गावात मीटिंग घेऊन हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजक कॉ.विनोद झोडगे यांनी केले आहे यावेळी विजय उरकुडे,महेंद्र राऊत,तुळशीदास ठाकरे,प्रभू धोटे,शंकर खरकटे, उत्तम दोणाडकर,प्रशांत बुले,मंगल राऊत,ओंकार ढोंगे, शुभम ठाकरे,सुधीर खेवले, गणेश राऊत,मंगेश प्रधान,नैतिक ढोरे,देविदास ठाकरे, भाऊराव ठाकरे, आदरक पिलांरे सह अनेक शेतकरी उपस्थित होते.

 

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular