चंद्रपुर शिवसेनेच्या वतीने शिवसेना नेत्या तथा विधानपरिषदेच्या उप-सभापती मा. ना. डॉ. निलमताई गोऱ्हे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रम करित उत्साहात साजरा..!

AMC24 News ️ ️
अरविंद चाहादे। मुख्य सपादक
9405714165
चंद्रपुर जिल्हा :- शिवसेना नेत्या तथा विधानपरिषदेच्या उप-सभापती मा. ना. डॉ. निलमताई गोऱ्हे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी आणि शिवसेना महिला आघाडी चंद्रपुर जिल्हाप्रमुख सौ. मिनलताई आत्राम यांच्या नेतृत्वात चंद्रपुरातील उर्जानगर कोंडी जि. प. उच्च प्राथ. शाळेच्या विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच देवाळा येथील डेबू सावली वृद्धाश्रमातील वृद्धांना फळवाटप करीत उत्साहात साजरा केला.
यावेळी जि. प. उच्च प्राथ. शाळेच्या विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच देवाळा येथील डेबू सावली वृद्धाश्रमातील वृद्धांना फळवाटप कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी व वृद्धांनी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषदेच्या उप-सभापती मा. ना. डॉ. निलमताई गोऱ्हे यांना दीर्घ आयुष्य लाभो व त्यांचे आरोग्य चांगले राहण्याची प्रार्थना करुन आशिर्वाद दिला.
सदर कार्यक्रमाला बल्लारपुर विधानसभा महिला संघटिका सौ. कृष्णाताई सुरमवार, शिवसेना उपतालुका प्रमुख विक्की महाजन, भद्रावती युवासेना उपशहर प्रमुख विवेक दुर्गे, शिवसैनिक योगेश मुऱ्हेकर, भद्रावती माजी नगरसेवक नाना दुर्गे आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.




