गृहमंत्री फडणवीस साहेब घुग्घूसच्या वाहतूक पोलिसांवर कारवाई करणार का?
AMC24 News. मुख्य संपादक
अरविंद चाहादे घुग्घूस। 9405714165
घुग्घूस)पोलीस खात्यातील महत्वाचा विभाग म्हणजे वाहतूक शाखा होय.या शाखेतील वाहतूक पोलीस शहरातील बंदोबस्त, शहरातील महत्वाच्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा न व्हावा यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक केली जात असते.मात्र घुग्घूस वाहतूक पोलीस शाखेचा विभाग वेगळ्याच कामात व्यस्त असून वाहतूक शाखा आर्थिक मोहमाया जमविण्यातच व्यस्त असल्याची चर्चा सध्या शहरात जोमात सुरु आहेया जमवलेल्या आर्थिक मोहमायात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह,वाहतूक पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस यांचा काही हिस्सा असल्याची कुजबुज आहे.
वणी- घुग्घूस मार्गावरील राजीव रतन चौकात निर्मानाधीन उड्डाणंपुलाचे काम सुरु असल्यामुळे याठिकाणी दिवसातून 20 ते 25 वेळ रेल्वे फाटक अर्धा -अर्धा तास बंद असतो यामुळे दोन्ही बाजूला वाहनाची रांगच रांग लागतात या ठिकाणी वाहतूक पोलिसांची आवश्यकता असताना ते वणी मार्गावरील टेम्पो क्लब परिसरात राहून जड वाहतूक या मार्गावरून सोडण्यासाठी वाहन चालकांकडून मोठ्या अर्थ व्यवहाराची मागणी करतात व नंतर 5 वर 00 शून्य चालकाकडून घेऊन वाहन सोडल्या जात असल्याचे वाहन चालकात चर्चा आहे.!
महत्वाचे म्हणजे उपप्रादेशिक विभागाच्या अधिकाऱ्याची ही जबाबदारी आहे मात्र घुग्घूस वाहतूक शाखेतील पोलीस वाहतूक अधिकारी वसुलीच्या नावाने ट्रक चालकांकडून सर्रास लूट करीत असल्याची माहिती नागरिकांसह प्रसारमाध्यमात आहे. या वाहतूक शाखेच्या वसुली बहादरावर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी गांभीर्याने घेऊन कारवाई करावी अशी मागणी ट्रक चालक व नागरिकांनी केली आहे.
गृहमंत्री फडणवीस साहेब घुग्घूसच्या वाहतूक पोलिसांवर कारवाई करणार का?
संपादकीय चमू



