घुग्घूस शहरात बकरी ईद उत्साहात साजरी.
AMC24 News.
मुख्य संपादक अरविंद चाहादे घुग्घूस
9405714165
बकरी ईद हे मुस्लिम बांधवांचे महत्वाचे धार्मिक आणि सामाजिक सण आहे या सणाचा मुख्य उद्देश म्हणजेच पैगंबर हजरत इब्राहिम (अ. स.)यांच्या बलिदानाला स्मरण करणे आणि अल्लाहच्या इच्छेला पूर्णपणे समर्पण करणे आहे.
बकरी ईद मध्ये बकऱ्याची किंवा शासनाने परवानगी दिलेल्या पशुची कुर्बानी देऊन मुस्लिम बांधव आपल्या प्रिय गोष्टीला अल्लाहसाठी अर्पण करतो हे त्याग आणि समर्पण व भावनांचा प्रतीक आहे.ईद निमित्त पोलीस प्रशासनाने ईदगाह परिसरात पेंडाल टाकून पोलीस उपनिरीक्षक तायवाडे, व पोलीस कर्मचाऱ्यांनी समाज बांधवाना गुलाबाचे फुल देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या व शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले.
शहरात बकरी ईद उत्साहात साजरी.



