*जागतिक पर्यावरण दिनानिमित्त काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न*
AMC24 News मुख्य संपादक
अरविंद चाहादे घुग्घूस
9405714165
घुग्घूस : आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यलयाच्या परिसरात काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या वतीने निसर्गाला पोषक व पूरक अश्या कडुलिंबाच्या झाडाचे रोपण करण्यात आले
याप्रसंगी रेड्डी यांनी पर्यावरणाचे महत्व विषद करीत असतांना सांगितले की घुग्घूस शहरातील हवा आज जीवघेणी ठरलेली आहे प्रदूषण नामक राक्षसाने पर्यावरनाला आपल्या ताब्यात घेतलेलं आहेत.
या राक्षसाच्या तावडीतुन निसर्गाला वाचवायचं असेल तर आपण प्रत्येकाला एका तरी वृक्षाचं रोपण व संगोपन करणे आवश्यक आहेत.
शहरातील प्रत्येक नागरिकांनी वृक्षारोपण करावे असे आवाहन ही रेड्डी यांनी केले आहेत.
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार,बालकिशन कुळसंगे, दिपक पेंदोर, तालुका सचिव विशाल मादर,NSUI अध्यक्ष आकाश चिलका,मोसीम शेख,रोहित डाकूर,सुनील पाटील, अरविंद चहांदे,दिपक कांबळे, देव भंडारी,नुरूल सिद्दीकी,विजय माटला, कुमार रुद्रारप,कपिल गोगला,शहंशाह शेख, सुमेश रंगारी,सुरज मिश्रा,रंजित राखुंडे, संजय कोवे, अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.





