- ब्रह्मपुरी। नाकाडे हॉस्पिटल वादाच्या भोवऱ्यात; परवानगी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

ब्रह्मपुरी विशेष प्रतिनिधि
अमित कणाके ब्रह्मपुरी।
१७/७/२०२६। ब्रह्मपुरी। शहरातील नाकाडे हॉस्पिटल पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. या हॉस्पिटलची इमारत पूर्वी नगरपालिकेने जीर्ण अवस्थेतील असल्याचे नमूद केले होते. काही दिवसांपूर्वी एका बिल्डरने ही इमारत खरेदी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असता, नगरपालिकेकडून इमारत धोकादायक असल्याचा दावा करण्यात आला होता.

मात्र, त्याच इमारतीत आता मल्टी स्पेशालिटी तसेच लहान मुलांचे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

नागरिकांचा सवाल असा आहे की, जी इमारत पूर्वी जीर्ण आणि धोकादायक असल्याचे सांगितले गेले, तीच इमारत अचानक सुरक्षित कशी ठरली? परवानगी देताना कोणत्या निकषांचा अवलंब करण्यात आला? संबंधित विभागाने इमारतीची नव्याने तांत्रिक तपासणी केली होती का?

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कागदपत्रे आणि परवानगी प्रक्रियेची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणात संबंधित अधिकारी आणि हॉस्पिटल प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहें
मुख्य संपादक अरविंद चाहादे घुग्घूस
9405714165



