Thursday, July 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedब्रह्मपुरी तालुक्यातील मूलभूत सुविधा 100 टक्के परिपूर्ण करा  पालकमंत्री डॉ. अशोक...

ब्रह्मपुरी तालुक्यातील मूलभूत सुविधा 100 टक्के परिपूर्ण करा  पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या सूचना विविध विभागांचा आढावा

ब्रह्मपुरी तालुक्यातील मूलभूत सुविधा 100 टक्के परिपूर्ण करा

 पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या सूचना

विविध विभागांचा आढावा

            AMC24 News 📰 🗞️ 

चंद्रपूर, दि. 16 : ब्रह्मपुरी तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार व अखंडित मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून तालुक्यातील मूलभूत सुविधा 100 टक्के पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले.

नियोजन भवन येथे ब्रह्मपुरी तालुक्यातील समस्यांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या समवेत विविध विभागाचे अधिकारी उपस्थित

होते.

बैठकीमध्ये तालुक्यातील वीज पुरवठा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य विभागाकडील लस व औषधांचा साठा, सार्वजनिक परिवहन व्यवस्था तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध मूलभूत सुविधांचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, प्रत्येक विभागाने लोकाभिमुख दृष्टीकोन ठेवून अधिक परिणामकारकपणे सेवा उपलब्ध करून द्याव्यात. प्रलंबित कामांना गती देत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

कोणताही पात्र शेतकरी सन 2026 च्या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश दिले. शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी सार्वजनिक परिवहन व्यवस्था सक्षम ठेवावी. आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांच्या सोयीच्या वेळेनुसार बससेवा उपलब्ध करून देण्याबाबतही संबंधित विभागाला सूचना करण्यात आल्या. विशेष गहन पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, यासाठी शासनाने शाळांच्या वेळेत आवश्यक बदल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

ब्रह्मपुरी येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाने दर्जेदार सेवा उपलब्ध करून आदर्श निर्माण केला असल्याचे नमूद करून पालकमंत्री म्हणाले, त्याच धर्तीवर तालुक्यातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांचाही दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या. आवश्यकतेनुसार जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीचा वापर करावा. त्यातून निधी उपलब्ध होणे शक्य नसल्यास जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनीही विविध विकासकामे व नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत सूचना मांडत संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करून सेवा वितरण अधिक सक्षम करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

 

मुख्य संपादक अरविंद चाहादे घुग्घुस 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular