Tuesday, June 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedचंद्रपूर जिल्हा कारागृहातील समाधीस्थळी उर्सानिमित्त 25 व 26 जून रोजी भाविकांसाठी प्रवेश

चंद्रपूर जिल्हा कारागृहातील समाधीस्थळी उर्सानिमित्त 25 व 26 जून रोजी भाविकांसाठी प्रवेश

चंद्रपूर जिल्हा कारागृहातील समाधीस्थळी उर्सानिमित्त 25 व 26 जून रोजी भाविकांसाठी प्रवेश

चंद्रपूर, दि. 23 : चंद्रपूर जिल्हा कारागृहाच्या परिसरातील पुज्य हजरत मखदुम शाहबुद्दीन शहा उर्फ गैबीशहा वली यांच्या समाधीस्थळी मोहर्रम सणानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही उर्स (यात्रा) आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने 25 जून व 26 जून 2026 रोजी भाविकांना समाधी दर्शनासाठी कारागृह परिसरात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे.

चंद्रपूर जिल्हा कारागृहाच्या पश्चिम दिशेला मुख्य तट क्र. 02 जवळ असलेल्या पुज्य हजरत मखदुम शाहबुद्दीन शहा उर्फ गैबीशहा वली यांच्या समाधीस्थळी दरवर्षी मोहर्रम सणानिमित्त उर्सचे आयोजन करण्यात येते. या उर्सासाठी चंद्रपूर जिल्ह्यासह परिसरातील विविध समाजातील मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी उपस्थित राहतात. 

उर्स कालावधीत समाधी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कारागृह परिसरात प्रवेश दिला जाणार आहे. तथापि, सुरक्षा व शिस्तीच्या दृष्टीने कारागृह परिसरात मोबाईल फोन, कॅमेरा तसेच पेढे, बर्फी किंवा इतर कोणतेही खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. प्रतिबंधित वस्तू आढळून आल्यास संबंधित भाविकास प्रवेश नाकारण्यात येईल.

भाविकांनी कारागृह प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून दर्शनासाठी यावे तसेच प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी अधीक्षक, चंद्रपूर जिल्हा कारागृह यांनी केले आहे.

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular