धानोरा फाटा भिषण अपघात! सर्वपक्षीय नेत्यांचा चार तास रस्ता रोको।

मृतकाला 10 लाख आणि गंभीर रित्या घायाळ व्यक्तीला 01 लाख रुपये मोबदला मंजूर
AMC24 News 📰 🗞️
घुग्घूस :- शहरा लगत असलेल्या धानोरा फाटा येथे एका वाहनाला धडक देऊन सैराटपणे पळून जाणाऱ्या टँकर चालकाने धानोरा फाटा येथे एका कार चालकाला धडक देऊन अनियंत्रित वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या सलूनच्या दुकानात तसेच लगत असलेल्या हॉटेल मध्ये धडकल्याने सलून चालक शंकर जुनारकर रा. अमराई वय 34 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला तर हॉटेल चालक युवक कर्मचारी व कार मधील प्रवासी गंभीररित्या घायाळ झाले.
घटनेला 20 तास लोटून ही ए.आर.एस. ( ARS ) टँकर चालक कंपनी व कंपनीचे अधिकारी कुठलाच मोबदला देण्यासाठी
तैयारी दर्शवीत नसल्याने व पोलीस स्टेशन मधील चर्चा फिस्कटल्याने काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी,तालुकाध्यक्ष अनिल नरुले,रोशन पचारे, सैय्यद अनवर,नगरसेवक नुरूल सिद्दीकी,गजानन मासिरकर, पांढरंकवडा येथील काँग्रेस नेते हितेश लोढे,भाजपा अध्यक्ष संजय तिवारी, राजेश मोरपाका, शिवसेना (उबाठा ) युवा नेते चेतन बोबडे, अमित बोरकर,व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी धानोरा फाटा येथे रस्ता रोको केला सदर आंदोलनामुळे पडोली ते गडचांदूर दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच – लांब रांगा लागल्या कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांनी दंगा नियंत्रण पथक व पोलिस दलाला आंदोलन स्थळी तैनात केले.
आंदोलनाच्या ठिकाणीच कंपनी अधिकाऱ्याशी झालेल्या चर्चेत मृतक शंकर जुनारकर यांना 10 लाख तसेच गंभीररित्या भाजलेल्या युवकांला 01 लाख रुपये मोबदला देण्यात आल्याने आंदोलनाची सांगता करण्यात आली
याप्रसंगी घुग्घूस शहरातील सर्वच राजकीय पक्ष सामाजिक संघटना, नगरपरिषद कर्मचारी व परिसरातील ग्रामीण मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.
AMC24 News. मुख्य संपादक
अरविंद चाहादे घुग्घूस 9405714165



