Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहावितरणचा भोंगळ कारभार! मिटर रिडींगपेक्षा 130 युनिटचे जास्त बिल पाठविले! ...

महावितरणचा भोंगळ कारभार! मिटर रिडींगपेक्षा 130 युनिटचे जास्त बिल पाठविले! ग्राहकांना लुटणाऱ्या महावितरण विरोधात आंदोलन उभारणार : दिप्ती सोनटक्क. 

महावितरणचा भोंगळ कारभार! मिटर रिडींगपेक्षा 130 युनिटचे जास्त बिल पाठविले!

ग्राहकांना लुटणाऱ्या महावितरण विरोधात आंदोलन उभारणार : दिप्ती सोनटक्क. 

AMC24 News ️

मुख्य संपादक।  अरविंद चाहादे घुग्घूस

9405714165

घुग्घूस : महावितरण कंपनीचे भोंगळ कारभार भोंगळ प्रकरण सतत पुढे येत असतात चंद्रपूर जिल्हा हा वीज उत्पादन करणारा जिल्हा असून भिषण उष्णतेचा ही जिल्हा आहे.
येथील जनता आधीच महागाडया वीजबिलांने त्रस्त असतांना महावितरण नागरिकांनी वापर न केलेल्या आगाऊ युनिटचे बिल पाठवत असेल तर नागरिकांना सरळ सरळ लुटण्याचाच हा प्रकार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या घुग्घूस शहरातून महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्षा दिप्ती सोनटक्के यांनी महावितरणचा भोंगळ कारभार चवऱ्याट्यावर आणला असून महावितरण अधिकाऱ्यांनी तातळीने कारवाई न केल्यास येथील अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शहरातील बहिरम बाबा नगर येथील देवराव सोनटक्के यांच्या घरातील घरगुती मिटरची रिडींग घेऊन गेल्या नंतर त्यांना चालू महिन्याचा बिल 4570 इतका आल्याने सोनटक्के यांनी बिल तपासून पाहिले असता चालू रिडींग ही 10541 इतकी दाखविण्यात आली त्यांनी मिटर रिडींग तपासणी केली असता त्यांना धक्काच बसला त्यांच्या मिटर मध्ये आजच्या दिवसाची चालू रिडींग 10411 इतकीच आहे.

जवळपास 130 युनिटचा बिल जास्त जोडून पाठविण्यात आला यासंदर्भातील तक्रार देण्यासाठी पीडित परिवार महावितरण कार्यलयात गेले असता अभियंता भटारकर हे कार्यलयात उपस्थित राहत नसून तसेच फोन ही उचलत नसल्याने सोनटक्के परिवाराना मानसिक व शारीरिक त्रास झाला आहे.

सदर कुटुंब सुशिक्षित असल्यामुळे त्यांना महावितरण कंपनी करीत असलेली वाढीव युनिटची चोरी लक्षात आली मात्र अशिक्षित नागरिकांना बिल समझत नाही त्यांच्या कडून अश्या पद्धतीने आगाऊ रक्कम उकडल्या जात असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यां सोनटक्के यांनी लावला असून नागरिकांनी त्यांना आलेला दर महिन्याचा विजबिल मिटर रिडींग तपासून पाहण्याचे आवाहन केले असून
काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या मार्गदर्शना खाली महावितरण कार्यालयाच्या भोंगळ कारभारा विरोधात आंदोलन छेळण्याचा इशारा सोनटक्के यांनी दिला आहे.    

 

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular