Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedवढा यात्रा ही श्रद्धेचा उत्सव, सुव्यवस्था राखणे आपले सामूहिक कर्तव्य.... ...

वढा यात्रा ही श्रद्धेचा उत्सव, सुव्यवस्था राखणे आपले सामूहिक कर्तव्य…. वढा यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न…

वढा यात्रा ही श्रद्धेचा उत्सव, सुव्यवस्था राखणे आपले सामूहिक कर्तव्य….

वढा यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न…

AMC24 News ️ 

चंद्रपूर.        यंदाही कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने ५ नोव्हेंबर रोजी विदर्भातील पंढरपूर समजल्या जाणाऱ्या वढा येथे भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन आढावा बैठक घेऊन यात्रेच्या नियोजनासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

वढा ही भाविकांची आस्था असलेली पवित्र भूमी आहे. कार्तिक पौर्णिमेला येथे लाखो भाविक येतात. त्यामुळे प्रशासनातील प्रत्येक विभागाने एकत्रितपणे काम करून यात्रा सुयोग्य व शांततेत पार पडेल, असा प्रयत्न करावा. यात्रेकरूंच्या सोयीसाठी दहा छोट्या बसेसची व्यवस्था करण्यात यावी. मुख्य मार्गासह वढा येथे जाणाऱ्या सर्व पर्यायी मार्गांची डागडुजी करून त्यांना योग्य बनविण्यात यावे. वाहतूक व्यवस्थेसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त लावावा आणि सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा उभारण्यात यावी. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, मदत केंद्र सुरू करावे, भक्तांसाठी मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी, तसेच पावसाची शक्यता लक्षात घेता पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी. इत्यादी सूचना बैठकीत प्रशासनाला दिले आहेत.

 

मुख्य संपादक.  अरविंद चाहादे घुग्घुस

9405714165

oppo_34

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular