Friday, May 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुख्यसंचालकाच्या खुर्चीकडे निमकरांची झेप* *भैय्यांची भेट, शालश्रीफळाचा मान राजकारणाच्या पटावर नव्या...

मुख्यसंचालकाच्या खुर्चीकडे निमकरांची झेप* *भैय्यांची भेट, शालश्रीफळाचा मान राजकारणाच्या पटावर नव्या समीकरणांची चाहूल*

*मुख्यसंचालकाच्या खुर्चीकडे निमकरांची झेप*

*भैय्यांची भेट, शालश्रीफळाचा मान राजकारणाच्या पटावर नव्या समीकरणांची चाहूल*

           AMC24 News.    मुख्य संपादक

अरविंद चाहादे घुग्घूस

9405714165

राजुरा (चंद्रपूर) | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी संचालक पदावर दणदणीत विजय मिळवून पुन्हा एकदा राजकारणात आपली ताकद दाखवून दिली आहे. निमकर यांच्या या यशाचं खास गौरव करण्यासाठी ३ जुलै रोजी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर खुद्द राजुरात दाखल झाले. त्यांनी निमकर यांच्या घरी जाऊन त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देत सन्मान केला आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

या भेटीत ‘राजकीय शिष्टाचार’ जितका स्पष्ट होता, तितकीच ‘संघटनात्मक रणनीती’ देखील वाचता येत होती. हंसराज अहीर आणि निमकर यांच्यातील जिव्हाळा व एकत्रितता सत्तेच्या समीकरणांवर परिणाम घडवणारा ठरू शकतो, अशी चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगली. राजकारणात माघार घेतलेले किंवा राजकीय प्रवाहतून बाजूला पडलेले नेते जेव्हा सहकार बँकेसारख्या प्रभावी संस्थांमधून पुन्हा उभारी घेतात, तेव्हा त्या खुर्चीमागे राजकीय शक्यता झपाट्याने वाढतात. निमकर यांचा संचालकपदावर विजय नेमका याच दिशेने इशारा देतो.

या स्नेहभेटीला माजी आमदार ऍड. संजय धोटे यांच्यासह विविध पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. उत्साहात भरलेल्या कार्यकर्त्यांच्या घोषणा, निमकर यांच्या गाठीभेटी आणि अहीर यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाचे राजकीय वजन वाढले. निमकर यांच्या घरापासून गावाच्या चावडीपर्यंत एकच चर्चा — “बँकेतल्या विजयाने राजकीय पुनरागमनाची हाक दिली का?”

सहकारी संस्थांच्या निवडणुकीकडे सामान्यतः दुर्लक्ष केलं जातं, पण जिथे नेता तयार होतो, जिथे गट तयार होतात, आणि जिथून निधी व नियोजनाचं बळ मिळतं — त्या सहकारी क्षेत्रातला हा विजय, म्हणजे पुढील राजकीय रणांगणाची पूर्वसूचनाच! आता निमकर या संधीचं रुपांतर ताकदीच्या हत्यारात करतात का, की ही फक्त सन्मानाची औपचारिक भेट ठरते, हे येणारा काळच सांगेल.    

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular