विदर्भ। MLA Sudhir Mungantiwar आ.सुधीर मुनगंटीवार यांचा धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी

August 04, 2025
AMC24 News। अरविंद चाहादे
मुख्य संपादक 9405714165
यांचा धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी
◾दुसऱ्या टप्प्यातील १३४ कोटींचा धान बोनस चंद्रपूरच्या पणन अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त
◾धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यातील बोनस लवकरच जमा होणार
◾मुख्यमंत्र्यांकडे तसेच विधानसभेत शेतकरी हितासाठी केलेल्या प्रभावी पाठपुराव्याबद्दल आ. मुनगंटीवार यांचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मानले आभार
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : शेतकरी हितासाठी सदैव सक्रिय असलेले राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा मोठे यश मिळाले आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यातील बोनस रक्कम लवकरच जमा होणार आहे. यापूर्वी शासनाकडून प्राप्त झालेली पहिल्या टप्प्यातील ६९ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून, आता १३४ कोटी २ लक्ष ५४ हजार ६३६ रुपयांची रक्कम चंद्रपूर जिल्ह्याच्या पणन अधिकारी विभागाकडे जमा झाली आहे. ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.
खरीप हंगाम २०२४–२५ अंतर्गत किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत सहभागी झालेल्या नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रती हेक्टर २० हजार रुपयांचा बोनस मिळावा, अशी मागणी आमदार मुनगंटीवार यांनी विधानसभेत व मुख्यमंत्र्यांसमोर सातत्याने लावून धरली होती. ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर शासनाने निर्णय घेत अन्न व नागरी पुरवठा विभागाने २५ मार्च रोजी अधिकृत शासन निर्णय जाहीर केला होता.



