लॉयड्स मेटल्स कंपनीतील (GDCL ) कामगाराची आत्महत्या नसून हत्याच?
काँग्रेसचे पोलीस निरीक्षकांना तपासा करीता निवेदन!

AMC24 News. अरविंद चाहादे घुग्घूस
9405714165
घुग्घूस : शहरातील लॉयड्स मेटल्स कंपनीत 1.2 मिलीयन टन प्रती वर्ष क्षमतेच्या वायर रॉड परियोजना व 4 मिलीयन टन प्रती वर्ष क्षमतेच्या पेलेट प्लांटचे कार्य जोरात सुरू असून याकामाकरीता उत्तर प्रदेश, बिहार व अन्य राज्यातील परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने लॉयड्स कंपनीत आलेले आहे.
या लॉयड्स कंपनीतील GDCL या कंपनीत ठेकेदारीत काम करणारा मजूर गोलू शर्मा रा.जमाव ता. भोजपुर जिल्हा – आरा बिहार हा लेबर कॉलनीतील प्लॉट नंबर 17 येथील निर्माणाधीन इमारतीच्या दुसऱ्या माळ्या वरून खाली पडून गंभीररित्या घायाळ झाल्याचा व उपचाराला नेल्यानंतर मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
मात्र सदर प्रकरण ज्याप्रमाणे घाई गडबडीत दाबण्यात आले.
तसेच अन्य कामगारांच्या चर्चेतून तसेच सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार या
रात्रीच्या वेळेस हा कामगार अन्य कामगारा सोबतच त्या इमारतीत उपस्थित होता याप्रसंगी त्याचा अन्य कामगारांसोबत वाद झाल्याचा व त्यावादातूनच कामगारला इमारतीतून धक्का दिल्याची माहिती व चर्चा होत असल्यामुळे याप्रकरणात हत्येच्या अँगलने तपास करावा व मृतकाच्या कुटुंबियांना मोबदला मिळवून द्यावा याकरिता काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांना निवेदन देऊन तपासणी करण्याची मागणी केली आहे.
कामगारला न्याय न मिळाल्यास GDCL या कंपनी विरोधात काँग्रेस तर्फे आंदोलन छेळण्याचा इशारा ही काँग्रेसतर्फे देण्यात आला याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार,तालुका सचिव विशाल मादर,सुनील पाटील, कुमार रुद्रारप, कपिल गोगला, निखिल पुनघंटी, रामस्वरूप बिमल, अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.




