चंद्रपूर -ते घुग्घूस मार्गावरील पांढरकवढा गावाजवळ झालेल्या दुचाकी अपघातात पत्नीचा मृत्यू तर पती जखमी झाल्याची घटना घडली.
AMC24 News. मुख्य संपादक अरविंद चाहादे
9405714165
घुगुस. पायल विशाल साळवे रा. अमराई वॉर्ड घुग्घूस असे मृतक महिलेचे नावं आहे.सदर घटना दिनांक 21 एप्रिलला सायंकाळी 7.35 वाजता घडली.
घुग्घूस येथील अमराई वॉर्डातील विशाल जानबा साळवे हे पत्नी पायल सोबत गडचांदूर येथे कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम आटोपून ते MH 34 /1052 क्रमांकाच्या दुचाकीने घुग्घूसकडे येत होते दरम्यान पांढरकवढा गावाजावळ असलेल्या गतिरोधकावार दुचाकी उसळल्याने विशालचे नियंत्रण सुटले या अपघातात दोघेही दुचाकीसह खाली पडले पायलच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने तिला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.




