Friday, May 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedपक्ष संघटनेसाठी राबणाऱ्या कर्तृत्ववान कार्यकर्त्यांची दखल घेतल्या जाईल - आमदार अभिजीत वंजारी*....

पक्ष संघटनेसाठी राबणाऱ्या कर्तृत्ववान कार्यकर्त्यांची दखल घेतल्या जाईल – आमदार अभिजीत वंजारी*. ब्रम्हपूरी येथे काॅंग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न

*पक्ष संघटनेसाठी राबणाऱ्या कर्तृत्ववान कार्यकर्त्यांची दखल घेतल्या जाईल – आमदार अभिजीत वंजारी*

*ब्रम्हपूरी येथे काॅंग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न*.       AMC24 News.   .      ब्रह्मपुरी तालुका  प्रतिनिधी.     अमित कनाके.      मो. .9860613690

 

 ब्रह्मपुरी.    ,,        पक्ष संघटनेत काम करतांना एकजुटीने काम करून पक्ष बळकट केले तर पक्षाला सुगीचे दिवस येतील. त्यासाठी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घेतली पाहिजे. जे कार्यकर्ते काम करत नसतील त्यांनी पद सोडावे व इतरांना संधी द्यावी. मात्र जे कार्यकर्ते इमानेइतबारे पक्ष कार्यासाठी झटतात अशा कर्तृत्ववान कार्यकर्त्यांची दखल घेतली जाईल असे प्रतिपादन नागपुर पदवीधर मतदार संघाचे आमदार तथा काॅंग्रेसचे चंद्रपूर जिल्हा निरिक्षक अॅड अभिजीत वंजारी यांनी केले.

पक्ष संघटनेचा विस्तार करून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ब्रम्हपूरी येथे काॅंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

यावेळी बैठकीला प्रामुख्याने काॅंग्रेस जिल्हा प्रभारी मुजीब पठाण, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी पंचायत समिती सदस्य थानेश्वर कायरकर, चिमुर तालुका काँग्रेस अध्यक्ष विजय गावंडे, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा मंगला लोनबले, शहर काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आमले यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतांना आमदार अभिजीत वंजारी म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याचे ऐकिवात आहे. महायुतीने बेइमानी करून सरकार बनवले आहे. महायुतीने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेचा महीना १५०० रू. वरून २१०० रू. करणार असल्याचे सांगितले होते. निवडणुकीला ६ महीन्यांचा कालावधी लोटुन गेला तरी त्यांनी पैसे मात्र वाढवले नाही. निवडणुकीच्या आखाड्यात उतरतांना महायुतीचा पराभव होणार हे निश्चित होते त्यामुळे त्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण आठवली असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

यावेळी प्रास्ताविकातून तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांनी ब्रम्हपूरी तालुक्यातील पक्ष संघटन बांधणी व विविध स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाला मिळालेले यश याबाबत माहिती दिली.
बैठकीचे सुत्रसंचलन डॉ.राजेश कांबळे यांनी तर आभार हितेंद्र राऊत यांनी मानले.
बैठकीला बहुसंख्येने काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.     

.

.

AMC24 News.  मुख्य संपादक अरविंद चाहादे

9405714165

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular