घुग्घुस इथे सरकारी रुग्णालयाचे थाप पडलेले काम लवकरात लवकर सुरू करा- अमित बोरकर

AMC24 new घुग्घूस. मुख्य सपादक अरविंद चाहादे।
आज दि ०,5/०1/2025रोजी आम आदमी पार्टी,घुग्घुस माझी शहर अध्यक्ष तथा नवयुवक बौद्ध मंडळ,घुग्घुस अध्यक्ष अमित बोरकर तर्फे चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. किशोरभाऊ जोरगेवार यांना सरकारी रुग्णालयाचे काम लवकरात लवकर सुरू करून सामान्य जनतेसाठी रुग्णालयाचे सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मागणी करण्यात आली आहे.
घुग्घुस क्षेत्रातील सरकारी रुग्णालयाचे काम मागील ०२ ते ०३ वर्षापासून थाप पडून आहे आणि सध्या कुठली सुविधा ( MRI ,CT SCAN, Blood Test,etc ) येथे उपलब्ध नाही त्यामुळे सामान्य जनतेला खूप त्रास सहन करावा लागत आहे छोट्या छोट्या आजारासाठी चंद्रपूरला धाव घ्यावं लागत आहे तसाच या क्षेत्रातील रुग्णवाहिका (ambulance) सर्विस सुद्धा पूर्ण पणे निष्कर्ष आहे. बरेचदा सोय सुविधा नसल्या मुळे आजारी व्यक्तीचा जीव सुद्धा गेला आहे यापुढे अशी घटना घडली नाही पाहिजे म्हणून लवकरात लवकर सहकारी रुग्णालयाचा काम पूर्ण करून सामान्य जनतेसाठी सरकारी हॉस्पिटल खुले करण्यात यावे अशी मागणी आमदार सहेबला करण्यात आली. 



