Monday, April 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedपत्रकारदिनी काँग्रेस तर्फे पत्रकार बांधवांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार

पत्रकारदिनी काँग्रेस तर्फे पत्रकार बांधवांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार

  • पत्रकारदिनी काँग्रेस तर्फे पत्रकार बांधवांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार

AMC24 new

मुख्य संपादक अरविंद चाहादे धुघुस   9405714165

धुगुस।    आचार्य बालशास्त्री जांभेकर यांच्या विसाव्या वाढदिवसादिनी त्यांनी 06 जानेवारी 1832 रोजी पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण काढले त्याचे औचित्य म्हणून महाराष्ट्रात 06 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.

पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्थभ असून पत्रकार बांधव ऊन वारा पाऊस सोसून व जीव धोक्यात घालून सत्य समाजापुढे ठेवत असतात त्यांच्या लेखणीतून दिन दुबळे वंचित शोषित यांच्या मागण्या उचलून धरल्या जातात त्यांचा आवाज प्रशासना पर्यंत पोहचविल्या जाते.
त्यांना न्याय मिळवून दिला जातो
पत्रकार बांधवांचे या सामाजिक कार्याला सलाम करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी पत्रकार बांधवांचे सत्कार करण्यासाठी काँग्रेस कार्यलयात आज दिनांक 06 जानेवारी रोजी कार्यलयात छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमात सर्वश्री ज्येष्ठ पत्रकार गजानन साखरकर ( दैनिक लोकमत ) ज्येष्ठ पत्रकार दयाशंकर तिवारी (दैनिक नवभारत ) मनोज कुमार कणकम ( दैनिक सकाळ )सुरेश खडसे ( दैनिक पुण्य नगरी ) नौशाद शेख (सर्च टीव्ही ) विक्की गुप्ता ( दैनिक भास्कर ) संजय पळवेकर ( दैनिक तरुण भारत ) कल्याण सोदारी (दैनिक कळंब नगरी ) संजय जिवनकर ( दैनिक नवराष्ट्र ) हनिफ शेख ( यू सी एन न्यूज )
पंकज रामटेके, ( चंद्रपूर महासागर)हनिफ मोहम्मद शेख (दैनिक विदर्भ कल्याण )देवानंद ठाकरे (पब्लिक पोस्ट )अरविंद चहांदे ( ए एम सी न्यूज )
साहिल सैय्यद ( दैनिक मीडिया वार्ता, दैनिक विदर्भ केसरी हे आवर्जून उपस्थित झाले याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार,तालुका सचिव विशाल मादर,मोसीम शेख,रोहित डाकूर,नुरूल सिद्दीकी,दिपक पेंदोर, दिपक कांबळे,बालकिशन कुळसंगे,कपिल गोगला, कुमार रुद्रारप,सुनील पाटील,शहशाह शेख,रंजित राखुंडे, सचिन नागपुरे,अंकुश सपाटे हे उपस्थित होते. 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular