Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिवंत राहण्या साठी घेतली जाणारी हवाच जीवघेणी झाली - दिप्ती सोनटक्के नगराध्यक्ष...

जिवंत राहण्या साठी घेतली जाणारी हवाच जीवघेणी झाली – दिप्ती सोनटक्के नगराध्यक्ष घुग्घूस। प्रदूषण नियंत्रणा करीता उपाययोजना राबवा आमदार किशोर जोरगेवार यांना निवेदनातून मागणी

जिवंत राहण्या साठी घेतली जाणारी हवाच जीवघेणी झाली – दिप्ती सोनटक्के नगराध्यक्ष घुग्घूस

प्रदूषण नियंत्रणा करीता उपाययोजना राबवा आमदार किशोर जोरगेवार यांना निवेदनातून मागणी

AMC 24 News 📰 🗞️ 

घुग्घूस :- चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात प्रमुख औद्योगिक शहर तसेच संपूर्ण महाराष्ट्र व चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात प्रदूषित शहर असलेल्या घुग्घूस शहराने प्रदुषणाच्या बाबतीत सर्वच रेकॉर्ड मोडले आहेत.

 

जिवंत राहण्यासाठी घेण्यात येत असलेली हवाच आज मृत्यूला कारणीभूत होत आहेत.
शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी नगरपरिषदेच्या सत्ता पक्षाने एका आठवड्या पूर्वी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांची भेट घेऊन शहरातील प्रदूषण समस्या समजून समस्या निकाली काढण्याची विनंती केली.


जिल्ह्यात पर्यावरण मंत्री पंकजा मुंढे आले असता ते घुग्घूस शहराला भेट देऊन प्रदूषणाची जीवघेणी समस्या समजून घेतील व तातळीने प्रदूषण नियंत्रणा करीता प्रशासनाला आदेश देतील अशी अपेक्षा होती.


पर्यावरण मंत्र्यांनी केवळ काही विशिष्ट राजकीय नेत्यांना लाभ पोहचविण्यासाठी उसगाव येथील विदर्भ मिनरल या उद्योगाला भेट देऊन निघून गेल्यामुळे संपूर्ण शहरवासियांचा अपेक्षाभंग झाल्याने आज दिनांक 18 एप्रिल रोजी नगराध्यक्ष दिप्ती सोनटक्के, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य सभापती नूरूल सिद्दीकी, काँग्रेस नेते सैय्यद अनवर यांनी स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेऊन त्यांना प्रदूषणाची भिषणता लक्षात आणून देत प्रदूषण नियंत्रणा करीता तातळीची अंमलबजावणी करा आपल्या मतदारांच्या जीवनाचे आरोग्याचे संरक्षण करा अशी विनंती केली.
याप्रसंगी आयेशा बुखारी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

AMC24 News 📰 🗞️

मुख्य संपादक

अरविंद चाहादे घुग्घूस    9405714165

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular