*राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्काराने ब्रम्हदेव ढोंगे यांचा गौरव*

AMC24 News 📰 🗞️
ब्रह्मपुरी प्रतिनिधी- मयुर। देवगडे
दि. २८ व २९ मार्च २०२६ रोजी सातारा येथे संपन्न झालेल्या ४४व्या कलाशिक्षण परिषदेत कृषक विद्यालय, चौगान (ता. ब्रम्हपुरी) येथील कलाध्यापक श्री. ब्रम्हदेव पंढरी ढोंगे यांना महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ, महामंडळ पुणे यांच्या वतीने “राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार २०२६” प्रदान करून गौरविण्यात आले

या पुरस्काराचे वितरण कलासंचालनालय, मुंबईचे संचालक डॉ. किशोरजी इंगळे तसेच महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ, महामंडळ पुणेचे राज्याध्यक्ष श्री. नरेंद्र बारई यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी ढोंगे यांच्या कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

या सोहळ्याला चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष तसेच सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री. कार्तिक नंदुरकर, सुप्रसिद्ध चित्रकार श्री. सुदर्शन बारापात्रे, नागपूर जिल्हा कलाध्यापक संघाचे विभागीय उपाध्यक्ष श्री. किशोरजी सोनटक्के व कार्यकारिणी सदस्यांसह अनेक कलाध्यापक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी श्री. ढोंगे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पुरस्कार स्वीकारताना श्री. ब्रम्हदेव ढोंगे यांनी या यशाचे श्रेय आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, संपूर्ण कलाध्यापक संघ तसेच आपल्या परिवाराला दिले. त्यांनी कला शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत राहण्याचा संकल्प व्यक्त केला.
या पुरस्कारामुळे ब्रम्हपुरी तालुक्याच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून परिसरातून श्री. ब्रम्हदेव ढोंगे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
.
AMC24 News 📰 🗞️
मुख्य संपादक।
अरविंद चाहादे घुग्घूस।



