घुग्घूस महावितरण कार्यालय शहरा बाहेर नेऊ नका
काँग्रेसची मागणी

घुग्घूस :- शहरातील महावितरण कार्यालय
( MSEB ) ऑफिस शहरा लगत असलेल्या मातारदेवी येथे स्थलांतरीत करण्यात येत असल्यामुळे शहरातील नागरिकांना प्रचंड त्रास होणार आहे.
मातारदेवी हा घुग्घूस पासून तीन किलोमीटर लांब अंतरावर आहे.

शहरातील अमराई तिलक नगर शांती नगर व शहरातील अन्य भागातील नागरिकांना मातारदेवी पर्यंत जाणे हे अंत्यन्त त्रासदायक व शारीरिक आर्थिक व मानसिक त्रास देणारा ठरत असल्यामुळे आज घुग्घूस शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने नगराध्यक्षा दिप्ती सोनटक्के, काँग्रेस अध्यक्ष तथा नगरपरिषद उपाध्यक्ष राजुरेड्डी, स्वच्छता व आरोग्य सभापती नुरूल सिद्दीकी, काँग्रेस नेते सैय्यद अनवर, नगरसेवक पंकज धोटे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, दिपक पेंदोर यांनी उप – कार्यकारी अभियंता अनिरुद्ध पेंदोर यांची भेट घेऊन निवेदन दिले तसेच महावितरण कार्यलयाला शहराच्या बाहेर नेण्यात येऊ नये अशी मागणी केली.

महावितरण कार्यलयाला शहरा बाहेर नेल्यास महावितरण विरोधात असहकार आंदोलन छेळण्याचा इशारा ही देण्यात आला।
AMC24 News.
मुख्य संपादक अरविंद चाहादे घुग्घूस



