Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedशासकीय निधीतून निर्माण प्रयास सभागृहाचा ' व्यवसायिक वापर. ...

शासकीय निधीतून निर्माण प्रयास सभागृहाचा ‘ व्यवसायिक वापर. गटारात साचलेल्या अन्नाच्या घाणीने हजारो नागरिकांचे ‘आरोग्य ‘ धोक्यात?

शासकीय निधीतून निर्माण प्रयास सभागृहाचा ‘ व्यवसायिक वापर

गटारात साचलेल्या अन्नाच्या घाणीने
हजारो नागरिकांचे ‘आरोग्य ‘ धोक्यात?

AMC24 News 📰 🗞️

घुग्घूस : शहरातील प्रभाग क्रं 04 येथे खासदार आमदार निधीतून तसेच अन्य शासकीय निधीतून भव्य असे प्रयास सभागृह निर्माण करण्यात आलेले आहेत.

या सभागृहाची देखरेखीचे जवाबदारी एका सामाजिक संघटनेला देण्यात आलेली आहे

 

या परिसरातील नागरिकांनी सदर सभागृहात दररोज हजारो लोकांचे स्वयंपाक बनत असून उरलेले अन्न व सांडपाणी सभागृहा बाहेरील नालीत सोडल्या जात असल्यामुळे याठिकाणी सडलेल्या अन्नामुळे प्रचंड दुर्गंधी पसरत असून परिसरातील हजारो नागरिकांना अनेक प्रकारचे जीवघेणे आजार होत असल्याने सदर परिसरातील नागरिकांनी ही तक्रार

 

नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा दिप्ती सोनटक्के यांना दिली असता नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिप्ती सोनटक्के, उप – नगराध्यक्ष राजुरेड्डी, बांधकाम सभापती रोशन पचारे तसेच स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य सभापती नुरूल सिद्दीकी यांनी नगरपरिषद अधिकाऱ्यांना घेऊन प्रयास सभागृहाची चौकशी केली असता याठिकाणी धक्कादायक प्रकार निरदर्शनास आले राजुरा येथील दत्ता गोहणे नावाचा कॅटरिंग व्यवसायिक येथे गेल्या सहा महिन्यापासून दररोज दोन हजार लोकांचे जेवण बनवून लॉयड्स कंपनीतील कामगारांना पुरवठा करीत आहे


या संदर्भातील कुठली ही परवानगी नगरपरिषदे कडून घेतलेली नाही
प्रयास सभागृह हे शहरातील नागरिकांच्या हितासाठी निर्माण करण्यात आलेला असून या शासकीय निधीतील सभागृहाचा शुद्ध व्यवसायिक नफा कमविण्या संदर्भात होत असलेल्या वापराच्या विरोधात नगरपरिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना तक्रार देण्यात येत असून या सभागृहाची देखरख करणाऱ्या संस्थेवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच सदर सभागृह नगरपरिषदेच्या स्वाधीन

 

करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली
पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष दिप्ती सोनटक्के, उप – नगराध्यक्ष राजुरेड्डी, बांधकाम सभापती रोशन पचारे, महिला व बाल कल्याण सभापती मालाताई मेश्राम, नियोजन व विकास सभापती रवीश सिंग, नगरसेवक व स्थायी समिती सुरज कन्नूर उपस्थित होते.  

 

AMC24 News 📰 🗞️

मुख्य संपादक  अरविंद चाहादे घुग्घूस

9405714165

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular