Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedग्रामपंचायत स्तरावरील कथित भ्रष्टाचाराविरोधात न्यायासाठी लढा रोहणे यांच्या आमरण उपोषणाला युवाशक्ती...

ग्रामपंचायत स्तरावरील कथित भ्रष्टाचाराविरोधात न्यायासाठी लढा रोहणे यांच्या आमरण उपोषणाला युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचा पाठिंबा

ग्रामपंचायत स्तरावरील कथित भ्रष्टाचाराविरोधात न्यायासाठी लढा

रोहणे यांच्या आमरण उपोषणाला युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचा पाठिंबा

चंद्रपूर | प्रतिनिधी   AMC24 News

 

दि. १३ फेब्रुवारी

चंद्रपूर.   दाताळा येथील सामाजिक कार्यकर्ते भारत रोहणे यांनी ग्रामपंचायत स्तरावरील कथित भ्रष्टाचाराबाबत १४ महिन्यांपूर्वी दिलेल्या तक्रारीवर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने जिल्हापरिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ ९ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
या आंदोलनाला युवाशक्ती ग्रामविकास संघटना, महाराष्ट्र राज्य व जिल्हा चंद्रपूर तर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, ग्रामपंचायत स्तरावर होत असलेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात रोहणे यांनी सुरू केलेला लढा न्यायाचा असून संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.
संबंधित दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी यासाठी जिल्हापरिषद, पंचायत समिती तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मागणी करण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. संवैधानिक मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान रोहणे यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले.
दरम्यान, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही,” असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला.
समर्थनपत्र देताना जिल्हाध्यक्ष योगेश मुऱ्हेकर, चंद्रपूर तालुका अध्यक्ष दयानंद नागरकर, सचिव पंचशील वाळके, जिल्हा उपाध्यक्ष संतोष बोपचे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

AMC24 News

मुख्य संपादक

अरविंद चाहादे घुग्घुस

9405714165

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular