- *प्रजासत्ताक दिनी राज्यस्तरीय यशाचा सन्मान : शिक्षक श्री. गौरव उगे यांचा गौरवपूर्ण सत्कार

AMC24 News 📰 🗞️
घुग्घुस. सरस्वती विद्या मंदिर, नकोडा येथे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. मुख्याध्यापिका सौ. पल्लवी वाढई मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा. किरणभाऊ बांदुरकर (सरपंच, नकोडा ग्रामपंचायत) तसेच मा. सौ. शशिकला पवार मॅडम यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे,
श्री. गौरव वामन उगे, शिक्षक, सरस्वती विद्या मंदिर, नकोडा यांनी शिक्षक व अधिकारी/कर्मचारी स्पर्धा अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय डॉक्युमेंट्री स्पर्धेत
“शिक्षणातील आव्हाने व उपाय” या विषयावर प्रभावी, आशयपूर्ण व विचारप्रवर्तक डॉक्युमेंट्रीची निर्मिती करून राज्यस्तरावर टॉप १० स्पर्धकांमध्ये स्थान मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मा. किरणभाऊ बांदुरकर (सरपंच, नकोडा) यांच्या शुभहस्ते श्री. गौरव उगे यांचा शाळेच्या वतीने गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. ही कामगिरी शाळेसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरली आहे.
या यशामुळे शिक्षण क्षेत्रातील श्री. गौरव उगे यांच्या अभ्यासपूर्ण दृष्टिकोनास व सर्जनशीलतेस राज्यस्तरावर मान्यता मिळाली आहे.
श्री. गौरव वामन उगे हे सरस्वती विद्या मंदिर, नकोडा, जिल्हा – चंद्रपूर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असून, त्यांच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक तसेच सर्जनशील कार्याचीही राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे.
या प्रसंगी संस्था व्यवस्थापन, सहकारी शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालकवर्ग यांच्याकडून श्री. गौरव उगे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, भविष्यातही अशीच यशाची मालिका अखंड सुरू राहो, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या यशाचे श्रेय श्री. गौरव उगे यांनी मा. संस्थाध्यक्ष श्री. रमेशचंद्रजी बागला सर, मा. मुख्याध्यापिका सौ. पल्लवी वाढई मॅडम तसेच सर्व सहकारी शिक्षकवृंद यांना दिले.
AMC24 News 📰 🗞️
मुख्य संपादक. अरविंद चाहादे घुग्घुस
9405714165



