Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedचंद्रपूरमध्ये महापालिका निवडणुकांनंतर, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

चंद्रपूरमध्ये महापालिका निवडणुकांनंतर, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

चंद्रपूरमध्ये महापालिका निवडणुकांनंतर, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

 

AMC24 News 📰 🗞️

चंद्रपूर
चंद्रपूरमध्ये महापालिका निवडणुकांनंतर, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी होत आहे, असा काँग्रेसच्याच प्रतिभा धानोकरांनी वडेट्टीवारांवर आरोप केला आहे. विजय वडेट्टीवार यांचा काँग्रेसचे 30 नगरसेवक निवडून आल्यानंतर, सत्ता स्थापनेचा प्रयत्न करायचा होता. मात्र, त्यांनी नगरसेवकांना घरातून उचलून, गटबाजी सुरु केली आहे, चंद्रपूरमध्ये काँग्रेसमधील अतर्गत गटबाजी समोर आली आहे.
राज्यातील काही महापालिकांमध्ये भाजप महायुतीला वर्चस्व मिळवता आले नाही. त्यापैकी एक म्हणजे विदर्भातील चंद्रपूर महानगरपालिका. येथील महापालिकेत 30 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठता आला नाही, 66 जागांचे संख्याबळ असलेल्या, या महापालिकेत बहुमताचा आकडा पार करण्यासाठी 34 नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे, काँग्रेसला 4 नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौर बनवता येईल. मात्र, 30 जागा जिंकलेल्या काँग्रेसमध्येच 2 गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, विजय वडेट्टीवर यांनी , चंद्रपूर महानगर पालिकेत काँग्रेसच्याच, नवनिर्वाचित नगरसेवकांना जबरदस्तीने पळवुन नेले, असा गंभीर आरोप काँग्रेसच्याच प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसचे 30 नगरसेवक निवडून आल्यानंतर, सत्ता सत्ता स्थापनेचा प्रयत्न करायचा होता. मात्र, त्यांनी नगरसेवकांना घरातून उचलून, गटबाजी सुरु केली आहे, असे करायला नको होते. त्यामुळे उर्वरित नगरसेवक सुरक्षित राहावे, यासाठी आम्ही त्यांना हॉटेलला नेले आहे, अशी माहिती काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसची, गटबाजी समोर आली आहे. चंद्रपूर हा माझा लोकसभा मतदार संघ आहे, त्यांनी माझ्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नये ही आमची मागणी आहे. नाहीतर उद्याला आम्ही त्यांच्या ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघात, ढवळाढवळ करू, असे काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले आहे.
तसेच, आमची मागणी काँग्रेस पक्षाने मान्य केली नाही, पक्षाला आमची गरज नसेल तर, मग आम्ही सामूहिक राजीनामा देऊ, अशी परखड भूमिकाही काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी घेतली आहे. त्यामुळे, चंद्रपूर महापालिकेतील विजयानंतर, काँग्रेसमधील वाद वाढतच चालला आहे. काँग्रेसचे 27 नगरसेवक निवडून आल्यानंतरही, स्पर्धा लागली आहे. फक्त सत्ता मिळवण्यासाठी , काँग्रेसचे 2 गट निर्माण होताना दिसत आहे. दोन्ही नेते वडेट्टीवार आणि धानोरकर नगरसेवकांची, पळवापळवी करत आहेत. चंद्रपुरातील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अजुनही संघर्ष चालु आहे, ही चंद्रपूर जिल्ह्यातील अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे.

AMC24 News 📰 🗞️

मुख्य संपादक अरविंद चाहादे घुग्घूस

9405714165

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular