जागतिक आदिवासी दिनानिमित्त घुग्घूस येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन
: AMC24 News.
संपादक. अरविंद चाहादे. 9405714165
घुग्घुस. . संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासी जमातीचे अस्तिव आदिवासी समाजाच्या हक्काचे समर्थन व संरक्षण करण्यासाठी 09 ऑगस्ट 1994 रोजी या दिवसाला जागतिक आदिवासी (मूळनिवासी) दिन ( International Day Of इंडिगेनौस People ) म्हणून मान्यता दिलेली आहेत.
त्या अनुषंगाने 09 ऑगस्ट हा जगभरात आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो घुग्घूस शहरात नवएकता जयसेवा बहुउद्देशीय संस्था चांडागढ यांच्या वतीने 09 ऑगस्ट 2015 रोजी अश्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत.
सकाळी 09 वाजता नव युवा सेवा पेरसापेन आदिवासी मंडळ गोंडवाना गोटूल येथे गोंगो (पूजा ) मूठ पूजा व सप्तरंगीं ध्वजारोहन करण्यात येईल सकाळी 10 वाजता कुंवारा भिवसेन पेनठाणा अमराई नवीन बांधकामाचा उदघाटन करण्यात येईल.
यानंतर 02.30 वाजता गोंडी ढेमसा सांस्कृतिक नृत्य रैलीचे आयोजन शहीद बाबुराव शेडमाके चौकातून गांधी चौक मार्गे पोलीस स्टेशन ते गोटूल पर्यंत काढण्यात येईल.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे प्रभारी अध्यक्ष मनोज चांदेकर, कोषाध्यक्ष दिपक पेंदोर, सहसचिव देविदास कोवे,यांनी केला असून कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता, मंदेश्वर पेंदोर, अंकुश उईके, मनीष आत्राम, प्रवीण जुमनाके, अरविंद किवे, स्वप्नील गेडाम, प्रवीण उईके, संदीप तोडासे, रोशन कळपते, केशवभाऊ टेकाम, ललित आत्राम, विठ्ठल कुमरे, कवडू मडावी, राकेश सलामे, धनराज आत्राम, संजय आत्राम, दिलीप टेकाम, अरुण पेंदोर, विजय आत्राम, संदीप आत्राम, देविदास कोडापे, प्रितम येटे, गुरु गेडाम, कुणाल टेकाम, गणेश धुर्वे, महेश किन्नाके, रवी उईके, बंडू सिडाम, महेश कोडापे, ज्ञानेश्वर उईके, हे अथक परिश्रम घेत आहेत.




