Friday, May 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedलॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशन आणि लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट तर्फे ७०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशन आणि लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट तर्फे ७०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप*

*लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशन आणि लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट तर्फे ७०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप*

AMC24 News

मुख्य संपादक अरविंद चाहादे  घुगुस

 

चंद्रपूर,      घुगुस.  ११ जुलै २०२५: लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशन आणि लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या आनंदो शाळा सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत, सलग तिसऱ्या वर्षीही शालेय सत्राच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. दिनांक १० व ११ जुलै २०२५ रोजी प्रियदर्शिनी कन्या विद्यालय घुगुस, न्यू इंग्लिश हायस्कूल पांढरकवडा आणि इंदिरा गांधी विद्यालय पडोली या तीन दत्तक शाळांमधील जवळपास ७०० विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळाला.
विद्यार्थ्यांना शालेय सहभागासाठी प्रोत्साहन मिळावे आणि शालोपयोगी साहित्याच्या अभावामुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला स्कूल बॅग, १२ नोटबुक, कंपास पेटी, आलेख वही आणि ड्रॉइंग वही असे महत्त्वाचे शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले.
याप्रसंगी लॉयड्स मेटलचे वरिष्ठ HR व्यवस्थापक श्री. कौशिक घोष, CSR व्यवस्थापक सौ. विद्या पाल, उपव्यवस्थापक श्री. दीपक साळवे, CSR अधिकारी अनुराग मत्ते, लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे समन्वयक श्री. मुकेश भोयर व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. यासोबतच तिन्ही शाळांचे प्राचार्य सौ. अनु खानझोडे, सौ. कुंदा चवले, डॉ. अपर्णा शुक्ला, संस्थाचालक सदस्य, केंद्र प्रमुख श्री. मुत्यालवार, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि पालकगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसत होते.

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular