*उर्जानगर जि. प. उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन शैक्षणिक साहित्य वाटप..!*
*ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या वतीने “एक हात मदतीचा” अभिनव उपक्रम
AMC24 News मुख्य संपादक
अरविंद चाहादे घुग्घूस। 9405714165
*चंद्रपुर :- उर्जानगर कोंडी येथील जि. प. उच्च श्रेणी प्राथमिक शाळेत आज दि. 23 जून 2025 रोज सोमवारला पहिला दिवस म्हणून शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष तथा शाळा व्यवस्थापन समितीचे हंगामी अध्यक्ष संतोष दशरथ पारखी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. शासनाकडून जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक व ड्रेस आणि ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दादाभाऊ केदार यांच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासंदर्भातील सूचनेनुसार “एक हात मदतीचा” एक छोटीशी मदत हा अभिनव उपक्रमांतर्गत चंद्रपुर जिल्हाध्यक्ष पारखी यांनी इयत्ता पहिले ते सातवींच्या सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन साहित्य वाटप करण्यात आले.*
*सदर शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या सचिव तथा मुख्याध्यापिका सुरेखा वांढरे, समितीचे सदस्य नामन पवार, अर्चना आंबिलकर, लक्ष्मी तांडेकर, अविनाश थोरात, शिक्षक नांदे सर, गादेवार मैडम, पालक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पाडण्यात आला.*



