Friday, May 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंतप्त महिलांचा दोन तास घुग्घूस नगरपरिषदेला घेराव "थोडी चुडिया पहेन लो "...

संतप्त महिलांचा दोन तास घुग्घूस नगरपरिषदेला घेराव “थोडी चुडिया पहेन लो ” आंदोलन

संतप्त महिलांचा दोन तास घुग्घूस नगरपरिषदेला घेराव “थोडी चुडिया पहेन लो ” आंदोलन

             AMC24 News. मुख्य संपादक

अरविंद चाहादे घुगुस

घुग्घूस : शहरातील नगरपरिषदेच्या भोंगळ व निष्क्रिय कार्याबद्दल महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार प्रतिभाताई धानोरकर, माजी पालकमंत्री विजय वड्डेटीवार, माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, व काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महिला शहर अध्यक्ष संगीता बोबडे, जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, जिल्हा महासचिव पद्मा त्रिवेणी, दुर्गा पाटील, पुष्पा नक्षीने यांच्या नेतृत्वा खाली आज दिनांक 19 जून 2025 रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास शेकडो संतप्त महिला पदाधिकाऱ्यांनी गांधी चौक येथून गली – गली मे शोर है नगरपरिषद काम चोर है
नगरपरिषद मुर्दाबादच्या घोषणा देत तब्बल दोन तास भर पावसात नगरपरिषदेला घेराव घातला नगरपरिषदेत मुख्याधिकारी निलेश रांजनकर उपस्थित नसल्याने आंदोलनकर्ते महिला आक्रोशीत झाल्या तसेच एका महिला कर्मचाऱ्यांनी अपशब्द बोलल्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलीस उप – निरीक्षक सचिन तायवाडे व पोलीस दलाने प्रकरण व्यवस्थितपणे हाताळले व मुख्याधिकाऱ्यांना तातळीने बोलविले असता मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांना आंदोलनकर्त्याच्या आक्रोशाला बळी पडावे लागले आंदोलनात उपस्थित नागरिकांनी मुख्याधिकाऱ्या समोर समस्याचा पाढाच वाचल्याने मुख्याधिकाऱ्याला समस्यांचे गांभीर्य जाणवले उपस्थित नागरिकांना मुख्याधिकारी यांनी 15 दिवसात शहरातील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने महिलांनी आंदोलन मागे घेतले व मुख्याधिकाऱ्यांना तंबी दिली नागरिकांच्या समस्या न सोडविल्यास यापेक्षा मोठा आंदोलन छेळण्यात येईल.

सदर आंदोलनात संध्या मंडल, मंगला बुरांडे, शिल्पा गोहील, राबिया शेख, रेखा रेगुंडवार,वंदना क्षीरसागर, वर्षा पाटील,कौशल्या माणुसमारे, शिलाताई धोंबे, नंदा पचारे,नाणीबाई क्षीरसागर,सुनीता श्रीवास्कर,मिरा पुसाटे, प्रतिभा वासेकर, अश्विनी धुर्वे, वंदना उमाटे, सिमा उमाटे,जोया शेख, लक्ष्मी गोदारी, दुर्गम्मा आरापेल्ली,आयेशा शेख, कामिना वैद्य, बेबीताई मारेकर, किताबून शेख, नूरजहाँ शेख, सविता धोंबे, सुनंदा नांदे, वृंदा हनुवंते, विद्या चौधरी, अविना कामतवार, गंगाबाई पचारे, सुनीता हिवरकर, विमलाबाई चौधरी, बडू रोहणकर, सुशीला तुराणकर, बुधम्मा इरला, ओडेक्का कासू, सुगना डोमा, पोसूबाई गोदारी, सररू बाई गोदारी, ईश्वर अक्का, सरोजा ढोके, शारदा अक्का,ज्येष्ठ नेते लक्ष्मण सदलावार,सैय्यद अनवर, ज्येष्ठ नेते शामराव बोबडे,जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार,युवा नेते सुरज कन्नूर,तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, ज्येष्ठ नेते शेख शमिउद्दीन,गौतम कोल्हे, विजय माटला, शेखर तंगडपल्ली, इंटक उपाध्यक्ष शहेजाद शेख,रोहित डाकूर,दिपक पेंदोर, सुनील पाटील, अरविंद चहांदे, थॉमस अर्नाकोडा,कपिल गोगला, सुरज मिश्रा,गणपत लभाने, अंकुश सपाटे,अजय त्रिवेणी व मोठ्या संख्येने नागरिकगन उपस्थित होते

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular