Friday, May 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedघरकुल लाभार्थ्यांना कमाल पाच ब्रास वाळू मोफत मिळणार महाराष्ट्र शासन

घरकुल लाभार्थ्यांना कमाल पाच ब्रास वाळू मोफत मिळणार महाराष्ट्र शासन

घरकुल लाभार्थ्यांना कमाल पाच ब्रास वाळू मोफत मिळणार
महाराष्ट्र शासन।   चा   निरनय

घरकुल लाभार्थ्यांना कमाल पाच ब्रास वाळू मोफत मिळणार
महाराष्ट्र शासन

AMC24 News मुख्य संपादक अरविंद चाहादे  

9405714165

   चंद्रपुर।      घरकुल लाभार्थ्यांना कमाल पाच ब्रास वाळू मोफत मिळणार
महाराष्ट्र शासन चे निर्णयानुसार आता घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास पर्यंत वाळू मोफत म्हणजेच रॉयल्टी शुल्क न भरता मिळणार आहे.
नदी घाटापासून गंतव्य स्थानापर्यंतची फक्त वाहतुकीचा खर्च लाभार्थ्याला करायचा आहे.
या योजनेअंतर्गत चंद्रपूर तालुक्यामधील 3000 पेक्षा अधिक घरकुलधारकांना सुमारे 7500 ब्रास वाळूचा मोफत वितरण करण्यात येणार आहे,
विशेष म्हणजे यासाठी लाभार्थ्याला अर्ज सुद्धा करण्याची किंवा तहसील कार्यालयात येण्याची सुद्धा गरज नाही
ग्रामपंचायत सचिवामार्फत रॉयल्टी परवाना लाभार्थ्यांना घरपोच दिल्या जाईल त्यानंतर तो परवाना घेऊन लाभार्थी घाटावर जाऊन वाळू न्यायचे आहे.
याकरिता शासनाने तालुका स्तरावर समिती गठित केली असून त्यामध्ये विजय पवार तहसीलदार हे समितीचे अध्यक्ष असून मुख्याधिकारी निलेश रांजणकर सदस्य,
वरिष्ठ भूवैज्ञानिक सदस्य , गटविकास अधिकारी श्रीमती भांगरे सदस्य तर जितेंद्र गादेवार नायब तहसीलदार हे सदस्य सचिव आहेत.
या उपक्रमाची सुरुवात दिनांक 21 /5/ 2025 रोजी दुपारी चार वाजता वढा येथे उपविभागीय अधिकारी चंद्रपूर श्री संजय पवार तहसीलदार चंद्रपूर श्री विजय पवार नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार, सचिन खंडाळे, मंडळ अधिकारी सुर्वे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
चंद्रपूर तालुक्यातील रेती घाटांचा लिलाव झालेले नसल्याने गडचिरोली जिल्ह्यातून रेती आणावा लागायचे
किंवा अवैध रेती तस्करांकडून रेती खरेदी करावी लागत होती,
त्यामुळे घरकुलधारकांच्या खिशाला फार मोठा भुर्दंडद सहन करावा लागत होता त्यामुळे एकंदरीतच या उपक्रमामुळे घरकुल धारकांना फार मोठा दिलासा मिळणार आहे।    

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular