Friday, May 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिवाची चिंता न बाळगता आगीतून सिलेंडर काढणाऱ्या यादव बांधवाचा शहर काँग्रेस तर्फे...

जिवाची चिंता न बाळगता आगीतून सिलेंडर काढणाऱ्या यादव बांधवाचा शहर काँग्रेस तर्फे सत्कार

जिवाची चिंता न बाळगता आगीतून सिलेंडर काढणाऱ्या यादव बांधवाचा शहर काँग्रेस तर्फे सत्

AMC24 new घुग्घूस मुख्य संपादक

अरविंद चाहादे।   9405714165

घुग्घूस : शहरातील वॉर्ड क्रं 06 बैरम बाबा नगर येथील सनातन अपार्टमेंट येथे 20 मार्च रोजी सांयकाळी सहा वाजताच्या सुमारास इमारतीत राहणाऱ्या व पेंटरचे काम करणारे आनंद बोगवार यांच्या घरातील स्टोर रूम मध्ये ऑइलपेंट व थिनर मध्ये आग लागली हे ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे पाहता पाहता आगीचा भडका उडाला या इमारतीत जवळपास पाच कुटुंब राहतात

आगीच्या संपर्कात गॅस सिलेंडर जर आले असते तर याठिकाणी सिलेंडरचा स्फ़ोट होऊन भिषण अपघातात इमारतीत राहणाऱ्या नागरिकांचे जीव धोक्यात आले असते हा विचार करून स्वतः च्या जीवाची तमा न बाळगता परिसरात राहणारे संजित यादव व त्यांचे लहान नंदजी यादव यांनी आग लागलेल्या घरातील तसेच खालील दोन घरातील गॅस सिलेंडर घराबाहेर काढले यामुळे संभावित धोखा टळला त्यांच्या समयसूचकता व धाडसाची दखल घेत काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या वतीने काँग्रेस कार्यलयात संजित यादव यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार,तालुका सचिव विशाल मादर,मोसीम शेख, एन. एस. यु. आय अध्यक्ष आकाश चिलका, रोहित डाकूर, कुमार रुद्रारप, देव भंडारी, अरविंद चहांदे,कपिल गोगला, बालकिशन कुळसंगे,सुनील पाटील,दिपक पेंदोर, निखिल पुनघंटी, अंकुश सपाटे,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular