भीमा कोरेगाव प्रतिकृती स्तंभाला घुग्घूस येथे मानवंदना देण्यात आली
————————–
AMC24 New घुग्घूस ). मुख्य संपादक अरविंद चाहादे 9405717165
घुगुस। परमपूज्य विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती पुतळा तहसील कार्यालयाजवळ बौद्ध सर्कल व स्मारक समिती यांच्यावतीने भीमा कोरेगाव प्रतिकृतीस्तंबाला मानवंदना देण्यात आली. सर्वप्रथम त्रिशरण पंचशील बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाकारूणीक तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून
वंदन करण्यात आले व भीमा कोरेगाव येथील एक जानेवारी 1818 मध्ये युद्ध झालेला 500 महार बटालियन शूरवीरांना मानवंदना व सलामी देण्यात आली. आयु. नागेश जी पताडे. विजय रामटेक. धीरज पाटील. बौद्ध सर्कल समितीचे अध्यक्षा आयु . दीप्ती सोनटक्के. आयु.वनकर गुरुजी. या सर्व मान्यवरांनी भीमा कोरेगाव युद्धाची शौर्यगाथा इतिहासाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता आंबेडकरी अनुयायी व इतर नागरिक उपस्थिती होते. यात प्रामुख्याने बंडू रामटेक, गंगाधर जी गायकवाड, आनंद निखाडे, अमृत सोदारी, बालाजी पतंगे. संदीप वासेकर, भारत साळवे, संजोग वाघमारे, देवानंद सुटे, अमित बोरकर, धीरज डोके, हेमंत पाझारे, योगेश पाझारे. पारीश डांगे,सोहन पाटील, रवी देशकर, चंद्रगुप्त घागर गुंडे , महादेव पकाले, अक्षय कोवले, सागर डांगे, गौतम घोरगाटे, आशिष मजगवडी, आयु.नर्मदा खोब्रागडे, उर्मिला लिहितकर, योगिता मून, सुजाता सोनटक्के, शिल्पा सोंडूळे. सविता मंडपे, व उषा आगदारी, सुनंदा सोदारी,इतर शेकडोच्या संख्येने नागरीक उपस्थिती होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष्यमान सुजित सोनटक्के यांनी केले व आभार प्रदर्शन आयुष्यमान श्याम कुमरवार यांनी मानले.




