Sunday, April 19, 2026
Google search engine
HomeUncategorized▪️विरोधकांना फेक नरेटिव्हचा आजार - देवराव भोंगळे यांचा 'त्या' वायरल पोस्टला उत्तर..!...

▪️विरोधकांना फेक नरेटिव्हचा आजार – देवराव भोंगळे यांचा ‘त्या’ वायरल पोस्टला उत्तर..! ▪️जनतेला संभ्रमात टाकणाऱ्यांना जनताचं योग्य उत्तर देईल..!

▪️विरोधकांना फेक नरेटिव्हचा आजार – देवराव भोंगळे यांचा ‘त्या’ वायरल पोस्टला उत्तर..!

▪️जनतेला संभ्रमात टाकणाऱ्यांना जनताचं योग्य उत्तर देईल..!

मुख्य संपादक अरविंद चाहादे

राजुरा – ( amc24 न्यूज ) : दि. ०२ राजुरा विधानसभा मतदारसंघाकरीता श्री. देवराव भोंगळे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच त्यांना जनतेचा मिळणारा प्रतिसाद बघून विरोधकांची कोल्हेकुई वाढत चालली आहे. त्यातून विरोधकांनी समाजमाध्यमांमध्ये त्यांच्या विरोधात तथ्यहीन पोस्ट करून त्यांची बदनामी करण्याचा अयशस्वी प्रयत्न चालविला आहे. अलीकडेच नामांकन अर्ज दाखल करतांना देवराव भोंगळे यांनी राजुरा शहरातून ऐतिहासिक अशी नामांकन रॅली काढली; हजारोंच्या संख्येने निघालेली ही रॅली बघून विरोधकांचे डोळे पिवळे झाले हे सत्य. त्यामुळे विरोधक भोंगळेंना घेरण्याचा एकही प्रयत्न सोडत नाहीत. परंतू विरोधांचे हे सर्व प्रकार धादांत खोटे असून मागील लोकसभा निवडणुकीपासुनच विरोधकांना जडलेला फेक नरेटिव्हचा आजार अजुनही बरा झाला नाही असे वाटते. त्यामुळेच राजुरा विधानसभा मतदारसंघातील सुजाण जनताच या संभ्रमात टाकणाऱ्यांना योग्य उत्तर देईल. अशी प्रतिक्रिया महायुतीचे उमेदवार देवराव भोंगळे यांनी त्या वायरल पोस्ट संदर्भात बोलतांना दिली.

विरोधकांनी देवराव भोंगळे यांच्या आर्थिक व्यवहारातील करप्रणालीचा पुरेपूर अभ्यास न करता अर्धवट माहीती समाजमाध्यमांमध्ये जाणीवपूर्वक वायरल करून त्यांच्यावर भ्रष्टाचारी असल्याची टिका केली. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. यावर श्री. भोंगळे यांनी तातडीने आपले स्पष्टीकरण दिले आहे.
खरंतर माझे माझे वडील स्व. विठोबा अर्जुनजी भोंगळे हे हयात असतांना त्यांचेकडे व्हॅट क्रमांक अस्तित्वात होता. परंतू दि. ०१ जुलै २०१७ रोजी देशातील करप्रणाली बदल होऊन वस्तु व सेवा कर म्हणजेच GST सुरू झाला. त्यामुळे सरकारने सर्व व्हॅट क्रमांकाना GST क्रमांकामध्ये रुपांतरित केले. परंतु हा GST क्रमांक सुरुवातीपासूनच वापरात नसल्याने तो वैध नाही अर्थात GST मध्ये स्थलांतर झाल्यापासून निष्क्रिय आहे.
ही वस्तुस्थिती असताना सुताचा साप करू पाहणारे काही अर्धज्ञानी लोक माझ्या विरोधात निरर्थक खोटे नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू त्यांच्या या अयशस्वी प्रयत्नांना विधानसभा क्षेत्रातील जनताच योग्य वेळी योग्य उत्तर देईल. असा सुचक इशारा देत ज्यांना वाटते की यामध्ये काही गैरव्यवहार आहे; अशांनी चंद्रपूर येथील वस्तू व सेवा कर GST कार्यालयात जाऊन पुरेपुर माहीती घ्यावी, अशी कोपरखळी ही त्यांनी लगावली.

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular