Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedजोरदार शक्तिप्रदर्शन करीत लोकांच्या रेकॉर्ड ब्रेक.. गर्दीने जनतेच्या लाडक्या हर्षदाताई काकडे यांचा...

जोरदार शक्तिप्रदर्शन करीत लोकांच्या रेकॉर्ड ब्रेक.. गर्दीने जनतेच्या लाडक्या हर्षदाताई काकडे यांचा शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल..!!

▪️जोरदार शक्तिप्रदर्शन करीत लोकांच्या रेकॉर्ड ब्रेक.. गर्दीने जनतेच्या लाडक्या हर्षदाताई काकडे यांचा शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल..!

अहमदनगर – ( AMC 24 न्यूज ) : जिल्ह्यातील शेवगाव शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन करीत लोकांच्या रेकॉर्ड ब्रेक गर्दीने जनतेच्या लाडक्या हर्षदाताई काकडे यांचा 222 शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील आमदारकीच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.प्रांताधिकारी मते साहेब व शेवगावचे-पाथर्डीचे दोन्ही तहसीलदार यावेळी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हर्षदाताई काकडे यांनी सांगितले की सर्व समाजाला बरोबर घेऊन मी विधानसभेसाठी अर्ज भरलेला आहे.तो फक्त गुलालासाठी भरलेला आहे.सर्व सामान्यांचे प्रश्न जसेच्या तसे वर्षांनुवर्षे तसेच प्रलंबित राहिलेले आहेत. या साखर सम्राटांनी मतदारसंघात काहीच विकास केलेला नाही असा आरोप सौ.हर्षदाताई काकडे यांनी केला.अँडव्होकेट शिवाजीराव काकडे म्हणाले की आज सर्व सामान्यांचा फार्म हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे गेला आहे.कोणाच्या पाठिंब्या शिवाय जनता विजयी होऊ शकते.सामान्य जनतेला आता कोणी रोखू शकत नाही.असे अँडव्होकेट काकडे यांनी सांगितले. यावेळी जनशक्ती मंचचे महासचिव आणि जेष्ठ नेते जगन्नाथ पाटील गावडे,आणि त्यांचे सर्व सहकारी आवर्जून उपस्थित होते. वाजत गाजत रॅली सुरू होण्यापूर्वी प्रारंभी कै.आबासाहेब काकडे यांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन चौकातील . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. नंतर छत्रपती शिवाजीमहाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन नंतर आखेगाव रोडवरील संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर तहसीलदार कार्यालयात फक्त पाच व्यक्तींनी जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.या रँलीमुळे शेवगाव शहरातील सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती.संपूर्ण शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात या आकर्षक रेकॉर्ड ब्रेक गर्दीचीच चौका चौकात चर्चा सुरू आहे. राजळे,ढाकणे,घुले या उमेदवारांकडून मात्र कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता गुपचूप अर्ज दाखल करण्यात आले. ही वादळा पुर्वीची शांतता असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular