Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeUncategorized▪️भाजप उमेदवार करण देवतळे यांची उमेदवारी रद्द करा.. ▪️आम आदमी पार्टी...

▪️भाजप उमेदवार करण देवतळे यांची उमेदवारी रद्द करा.. ▪️आम आदमी पार्टी ची निवडणूक अधिकारी यांच्या कडे तक्रार.. मुख्य संपादक तथा संचालक श्री. तुळशीराम जांभूळकर वरोरा – ( इंडिया 24 न्यूज ) : विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार करण देवतळे यांनी त्यांच्या प्रचारासाठी लावलेल्या बॅनरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र लावून बहुजन समाजाच्या व समस्त जनतेच्या भावनांना धक्का दिला आहे. असे कृत्य करून भाजपा उमेदवार करण देवतळे यांनी महापुरुषांचा अपमान केला असून, यामुळे जनतेत संतापाची भावना निर्माण झाली आहे. आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुरज शहा आणि युवा जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुमित हस्तक यांनी यासंदर्भात निवडणूक अधिकारी, वरोरा यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात त्यांनी भाजपा उमेदवार करण देवतळे यांच्या उमेदवारीवर कारवाई करून त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे, कारण असे कृतीमुळे भारतीय संविधानाच्या आदर्शांवर आघात होतो आहे. आम आदमी पार्टीने स्पष्ट केले आहे की, महापुरुषांच्या प्रतिमांचा आदर राखणे हे सर्व नागरिकांचे व पक्षांचे कर्तव्य आहे, व अशा प्रकारची कृती संपूर्ण बहुजन समाजाच्या भावनांना निंदनीय धक्का देणारी आहे. यावेळी आम आदमी पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, जिल्हा सहसचिव सोनल पाटील, वरोरा तालुका प्रमुख गौरव मेले, भद्रावती तालुका प्रमुख सुरज खंगार, भद्रावती शहर अध्यक्ष अनिल कुमार राम, भद्रावती युवा शहर अध्यक्ष रोहन गज्जेवार, ओम पारखी, सुशांत रायपुरे व समस्त कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

▪️भाजप उमेदवार करण देवतळे यांची उमेदवारी रद्द करा..

▪️आम आदमी पार्टी ची निवडणूक अधिकारी यांच्या कडे तक्रार..

मुख्य संपादक अरविंद चाहादे

वरोरा – ( amc24 न्यूज ) : विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार करण देवतळे यांनी त्यांच्या प्रचारासाठी लावलेल्या बॅनरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र लावून बहुजन समाजाच्या व समस्त जनतेच्या भावनांना धक्का दिला आहे.

असे कृत्य करून भाजपा उमेदवार करण देवतळे यांनी महापुरुषांचा अपमान केला असून, यामुळे जनतेत संतापाची भावना निर्माण झाली आहे. आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुरज शहा आणि युवा जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुमित हस्तक यांनी यासंदर्भात निवडणूक अधिकारी, वरोरा यांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनात त्यांनी भाजपा उमेदवार करण देवतळे यांच्या उमेदवारीवर कारवाई करून त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे, कारण असे कृतीमुळे भारतीय संविधानाच्या आदर्शांवर आघात होतो आहे.

आम आदमी पार्टीने स्पष्ट केले आहे की, महापुरुषांच्या प्रतिमांचा आदर राखणे हे सर्व नागरिकांचे व पक्षांचे कर्तव्य आहे, व अशा प्रकारची कृती संपूर्ण बहुजन समाजाच्या भावनांना निंदनीय धक्का देणारी आहे. यावेळी आम आदमी पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, जिल्हा सहसचिव सोनल पाटील, वरोरा तालुका प्रमुख गौरव मेले, भद्रावती तालुका प्रमुख सुरज खंगार, भद्रावती शहर अध्यक्ष अनिल कुमार राम, भद्रावती युवा शहर अध्यक्ष रोहन गज्जेवार, ओम पारखी, सुशांत रायपुरे व समस्त कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular