Sunday, April 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उद्या आमदार किशोर जोरगेवार दाखल करणार...

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उद्या आमदार किशोर जोरगेवार दाखल करणार नामांकन अर्ज..!!

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उद्या आमदार किशोर जोरगेवार दाखल करणार नामांकन अर्ज..!!

दुपारी १२ वाजता निघणार रॅली..!!

*संपादक*मुख्य सपादक अरविंद चाहादे

चंद्रपूर – ( amc 24 न्यूज ) : चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. उद्या ते भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ना. सुधीर मुनगंटीवार, आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची प्रमुखतेने उपस्थिती राहणार आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांना भाजप तर्फे महायुतीची उमेदवारी देण्यात आली असून आता ते भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणुकीला समोर जाणार आहेत. “जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेच, आता भाजपची साथ मिळाल्याने चंद्रपूरातील विकासकामे आणखी गतीशील करण्यात मदत होईल,” असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी म्हटले आहे.
उद्या सोमवारी दुपारी १२ वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या गांधी चौक येथील कार्यालयाजवळून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार नामांकन अर्ज दाखल करतील. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.


RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular