Sunday, July 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्हा परिषद शाळांतील 251 सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान...

जिल्हा परिषद शाळांतील 251 सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचा प्रयत्न

जिल्हा परिषद शाळांतील 251 सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचा प्रयत्न

AMC24 News 📰 🗞️ 

विशेष प्रतिनिधी.  चंद्रपूर

चंद्रपूर, दि. 24 : जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि अध्यापनाची सातत्यपूर्ण व्यवस्था कायम ठेवण्यासाठी 251 सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार ही कार्यवाही करण्यात आली असून, शासनाच्या दिनांक 7 जुलै 2023 व 4 नोव्हेंबर 2025 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा परिषद चंद्रपूरने पात्र सेवानिवृत्त शिक्षकांकडून अर्ज मागविले होते. प्राप्त अर्जांची छाननी, पात्रता पडताळणी तसेच पंचायत समिती स्तरावरील समुपदेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गटशिक्षणाधिकारी यांनी सादर केलेल्या निवड यादीच्या आधारे 251 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली.

जिल्हा परिषद चंद्रपूरच्या प्राथमिक शाळांमध्ये सध्या शिक्षकांची एकूण 731 पदे रिक्त आहेत. त्यापैकी 251 पदे भरल्याने अनेक शाळांमधील अध्यापन व्यवस्था अधिक सक्षम होणार असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यास मोठी मदत मिळणार आहे. तसेच शिक्षणाची गुणवत्ता कायम राखण्यासही या निर्णयाचा सकारात्मक परिणाम होईल.

उर्वरित रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राधान्याने सुरू असून, पात्र सेवानिवृत्त शिक्षकांची उपलब्धता आणि नियमानुसार आवश्यक कार्यवाही पूर्ण करून पुढील नियुक्त्याही करण्यात येणार असल्याची माहिती उप शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी दिली.

जिल्हा परिषद चंद्रपूर विद्यार्थ्यांना अखंडित, गुणवत्तापूर्ण व परिणामकारक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असून, शिक्षकांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

 

मुख्य संपादक

अरविंद चाहादे घुग्घुस     9405714165

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular