Sunday, June 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedबालकांचे आरोग्य जपूया पोलिओ मुक्त घुग्घूस करू या :- नगरपरिषद घुग्घूस ...

बालकांचे आरोग्य जपूया पोलिओ मुक्त घुग्घूस करू या :- नगरपरिषद घुग्घूस नगराध्यक्ष व उप – नगराध्यक्ष यांच्या हस्ते मुलांना पोलिओ डोस देऊन कार्यक्रमाला सुरुवात

आरोग्य जपूया
पोलिओ मुक्त घुग्घूस करू या :- नगरपरिषद घुग्घूस

नगराध्यक्ष व उप – नगराध्यक्ष यांच्या हस्ते मुलांना पोलिओ डोस देऊन कार्यक्रमाला सुरुवात

घुग्घुस : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान घुग्घूस शहरात उत्साहात संपन्न करण्यात आला.
देशाला पोलिओ मुक्त ठेवण्यासाठी सन 1995 पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे महाराष्ट्रात शेवटचा पोलिओ रुग्ण सन सप्टेंबर 2010 सप्टेंबर मध्ये बीड जिल्ह्यात आढळला होता.

 

शून्य ते पाच वर्षांच्या लहान मुलांना नगराध्यक्ष दिप्तीताई सोनटक्के उप – नगराध्यक्ष राजुरेड्डी यांच्या हस्ते पोलिओचे दोन थेंब (डोस) देऊन
शहरात या मोहिमेची सुरुवात करण्यात आली याकरिता शहरातील प्रमुख चौकात तसेच आंगणवाडी केंद्रामध्ये पोलिओ बूथ उभारण्यात आले ,

ही देशव्यापी लसीकरण मोहीम खरोखरच कौतुकास्पद आहे.
पाच वर्षांखालील सर्व मुलांना ‘जीवनाचे दोन थेंब’ (OPV) देऊन या गंभीर आजाराचे समूळ उच्चाटन करणे आणि देशाला पोलिओमुक्त ठेवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
आपण सर्वांनी सर्व कामे बाजूला ठेवून आपल्या मुलांना पोलिओ डोस अवश्य द्यावे असे आवाहन नगराध्यक्ष व उप – नगराध्यक्ष तसेच सर्व सभापती नगरसेवक व नगरसेविकांनी केली आहे.

AMC 24 News 📰 🗞️

मुख्य संपादक अरविंद चाहादे घुग्घुस

9405714165

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular