Tuesday, June 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedघुग्घुस शहरावर दुःखाचा डोंगर; पाच अल्पवयीन मुलांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू.  

घुग्घुस शहरावर दुःखाचा डोंगर; पाच अल्पवयीन मुलांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू.  

घुग्घुस शहरावर दुःखाचा डोंगर; पाच अल्पवयीन मुलांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू.  

 

घुग्घुस : वर्धा नदीच्या किनारी आंघोळीसाठी गेलेल्या पाच अल्पवयीन मुलांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण घुग्घुस शहरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही मुले नदीकिनारी गेली असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, बचाव पथक आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
या दुःखद घटनेमुळे संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घुग्घुस शहरातील विविध सामाजिक संस्था, नागरिक आणि मान्यवरांनी मृत मुलांना श्रद्धांजली अर्पण करून कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
“ईश्वर दिवंगत आत्म्यांना शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो,” अशा भावना सर्व स्तरातून व्यक्त केल्या जात आहेत.

AMC24 News 📰 🗞️

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular